बदनामी करणाऱ्या ‘त्या’ महिलेला रोखा; राहुल शेवाळेंची उच्च न्यायालयात याचिका

लग्नाचे खोटे आमिष दाखवून बलात्कार केल्याचा आरोप करणा-या महिलेला आपल्याविरोधात सोशल मीडियावर बदनामीकारक मजकूर प्रसारित न करण्याचे आदेश द्यावेत, या मागणीसाठी शिंदे गटाचे खासदार राहुल शेवाळे यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली आहे.

खासदार शेवाळे यांच्यावर गुन्हा नोंदवण्याची मागणी संबंधित महिलेने गेल्या वर्षी जुलै महिन्यात केली होती. तसेच, तिने सोशल मीडियाच्या वेगवेगळ्या प्लॅटफाॅर्मवर शेवाळेंविरोधात मजकूरही पोस्ट केला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना आपल्या तक्रारीची दखल घेऊन गुन्हा नोंदवण्याची विनंतीही महिलेने केली होती. या सगळ्याची दखल घेत संबंधित महिलेवर कारवाई करण्याचे निर्देश केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्रालय, इंडियन ब्राॅडकास्टिंग फेडरेशन आणि ट्वीटर यांना द्यावेत, अशी मागणी शेवाळे यांनी याचिकेद्वारे केली आहे.

( हेही वाचा: पर्यावरण संवर्धन अभियानाला जनचळवळीचे स्वरूप यावे – सुधीर मुनगंटीवार )

महिलेच्या दाव्याने वैयक्तिक जीवनात समस्या

संबंधित महिलेच्या खोट्या आरोपांमुळे वैयक्तिक जीवनात अनेक समस्या निर्माण झाल्याचा दावा शेवाळे यांनी केला आहे. संबंधित महिला कोणाच्यातरीवतीने खोटे आरोप करत असल्याचेही शेवाळे यांनी याचिकेत नमूद केले आहे. याचिकेवर 24 जानेवारीला सुनावणी होण्याची शक्यता आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here