‘वर्षा’वरील स्नेहभोजनाला शिंदे गटातील ‘हा’ आमदार राहणार गैरहजर, चर्चांना उधाण

88

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेतून केलेल्या उठावाला अनेक आमदारांनी पाठिंबा दिला आणि राज्यातील महाविकास आघाडी सरकार कोसळले. शिंदे-फडणवीस सरकारने दोन महिन्यांचा कार्यकाळ पूर्ण केल्यानंतर आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सरकारमधील आमदारांना स्नेहभोजनाचे निमंत्रण दिले आहे. या स्नेहभोजनाला शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट हे अनुपस्थित राहणार असल्याची माहिती मिळत आहे. त्यामुळे पुन्हा एकदा राजकीय चर्चा रंगल्या आहेत.

शिरसाट नाराज?

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वर्षा बंगल्यावर शिंदे-फडणवीस सरकारमधील सर्व आमदार व मंत्र्यांना स्नेहभोजनासाठी निमंत्रित केले आहे. पण या स्नेहभोजनाला शिरसाट हे गैरहजर राहणार आहेत. सरकारच्या पहिल्या मंत्रिमंडळ विस्तारात संजय शिरसाट यांना स्थान न देण्यात आल्यामुळे ते नाराज असल्याची चर्चा होत आहेत. त्यामुळे शिरसाट हे स्नेहभोजनाला जाणार नसल्याचे समजत आहे. पण संजय शिरसाट यांनी मात्र यात कुठलेही तथ्य नसल्याचे सांगितले आहे.

मी नाराज नाही- शिरसाट

तुम्ही अशा बातम्या पसरवू नका. मी दोन दिवसांपूर्वीच मुख्यमंत्र्यांच्या घरी जाऊन त्यांची भेट घेतली. मतदारसंघातील कामांसाठी मी त्यांची पूर्वपरवानगी देखील घेतली आहे. त्यामुळे नाराज असण्याचं काहीच कारण नाही. मुख्यमंत्री शिंदेंनी मला त्या कामासाठी ती परवानगी दिली आहे त्यामुळे मी तिथे जात आहे, असे आमदार संजय शिरसाट यांनी म्हटले आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.