शिंदे गटाच्या ‘या’ खासदाराला लोकसभेत मोठी संधी मिळण्याची शक्यता,मोदी सरकारचा विचार

105

राज्यात शिंदे-फडणवीस सरकार सत्तेत आल्यानंतर आता शिंदे गटाला भाजपकडून केंद्रीय पातळीवर स्थान देण्यात येणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. लोकसभा आणि राज्यसभेतील स्थायी समित्यांपैकी एका समितीवर शिंदे गटाच्या एका खासदाराची वर्णी लागण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. लवकरच यावर निर्णय होण्याची शक्यता आहे.

या खासदाराचे नाव चर्चेत

लोकसभा आणि राज्यसभेतील महत्वाच्या अशा स्थायी समितींची मोदी सरकारकडून लवकरच पुनर्रचना करण्यात येणार असून ज्या समित्यांचे अध्यक्ष काँग्रेस नेते आहेत त्या समित्यांमधून काँग्रेस नेत्यांचा पत्ता कट होणार असल्याचे सांगितले जात आहे. दळणवळण आणि माहिती तंत्रज्ञान समितीच्या अध्यक्षपदी सध्या शशी थरुर आहेत. त्यांची ही जागा एनडीएतील शिंदे गटाच्या वाट्याला येऊ शकते. शिंदे गटाचे खासदार प्रतापराव जाधव यांना या समितीच्या अध्यक्षपदाची ऑफर देण्यात येणार असल्याचे सूत्रांनी सांगितले आहे.

(हेही वाचाः मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना जीवे मारण्याची धमकी, गुप्तचर यंत्रणेची माहिती)

काँग्रेस नेत्यांची मागणी

प्रतापराव जाधव हे शिंदे गटाचे बुलढाण्यातील खासदार आहेत. एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेतून केलेल्या उठावानंतर जे 12 खासदार शिंदे गटात सहभागी झाले त्यांच्यात प्रतापराव जाधव देखील होते. जाधव यांचे नाव जरी या समितीच्या अध्यक्षपदासाठी पुढे येत असले तरी काही काँग्रेस नेत्यांनी शशी थरुर यांचा कार्यकाळ वाढवण्याची मागणी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांना पत्राद्वारे केली आहे.

भाजप खासदार नाराज

दळणवळण आणि माहिती तंत्रज्ञान समितीमधील सत्ताधारी भाजप खासदार आणि समिती अध्यक्ष शशी थरुर यांच्यात वाद आहे. त्यामुळे या समितीचे सदस्य निशिकांत दुबे यांनी थरुर यांच्या हकालपट्टीची अनेक वेळा मागणी केली होती. त्यामुळे थरुर यांचे अध्यक्षपद जाण्याची शक्यता असल्याचे बोलले जात आहे.

(हेही वाचाः ‘तुम्ही गेलात आणि शिवसेनेचा वाघ मॅटिनी शोमधला झाला’, शिंदे समर्थकांचं बाळासाहेबांना भावनिक पत्र! उद्धव ठाकरेंवर टीका)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.