मोदी सरकारकडून लवकरच नव्याने मंत्रिमंडळ विस्तार होणार असल्याची माहिती मिळत आहे. यामध्ये काही नव्या चेह-यांना संधी मिळणार असल्याचे सांगण्यात येत आहे. यामध्ये राज्यात सत्तांतर करण्यामध्ये मोठी भूमिका बजावणा-या शिंदे गटातील दोन खासदारांना देखील नव्या केंद्रीय मंत्रिमंडळात स्थान मिळणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
केंद्रीय मंत्रिमंडळातील मंत्र्यांचे प्रगती पुस्तक मोदी सरकारकडून तपासण्यात येत आहे. यामध्ये ज्या मंत्र्यांची कामगिरी असमाधानकारक आहे त्या मंत्र्यांची मंत्रिमंडळातून उचलबांगडी करण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे नव्या मंत्रिमंडळात नव्या चेह-यांना संधी मिळणार असल्याचे बालले जात आहे.
(हेही वाचाः बेरोजगारांना केंद्र सरकार देतंय 6 हजार रुपये? सरकारने सांगितले योजनेतील सत्य)
शिंदे गटातील खासदारांना 2 मंत्रिपदे?
राज्यात एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्ताखाली शिवसेनेच्या 40 आमदारांनी मिळून सत्तापालट घडवून आणल्यानंतर, शिवसेनेच्या 12 खासदारांनी देखील शिंदे गटात प्रवेश केला. राज्यात शिंदे-भाजप युतीचं सरकार स्थापन झालं आहे. त्यामुळे केंद्रातही शिंदे गटातील खासदारांना मंत्रीपद मिळणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
नव्या चेह-यांना संधी
जुलै 2021 मध्ये केंद्रीय मंत्रिमंडळाचा दुस-यांदा विस्तार करण्यात आला होता. यावेळी 43 खासदारांनी मंत्रीपदाची शपथ घेतली होती. यामध्ये महाराष्ट्रातून नारायण राणे यांना सूक्ष्म,लघू व मध्यम उद्योग मंत्रीपद देण्यात आले होते. तसेच भागवत कराड यांना केंद्रीय अर्थ राज्यमंत्री,डॉ.भारती पवार यांना केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री,कपिल पाटील यांना केंद्रीय पंचायत राज राज्यमंत्रीपद देण्यात आले होते. तसेच ज्योतिरादित्य शिंदे,सर्बानंद सोनोवाल यांच्यासह 36 नव्या चेह-यांचा मंत्रिमंडळात समावेश करण्यात आला होता. त्यामुळे यावेळी देखील नव्या नेतृत्वांकडे जबाबदारी सोपवण्यात येणार असल्याचे बोलले जात आहे.
Join Our WhatsApp Community