शिंदे गटाचा राष्ट्रवादीवर गंभीर आरोप; महाराष्ट्रातील गावांना वेगळे होण्यासाठी फूस

86
सध्या राज्यातील सीमा भागातील गावे दुसऱ्या राज्यात जाण्याच्या तयारीत आहेत, अशी जोरदार चर्चा सुरु झाली आहे. त्यात विशेष करून कर्नाटक राज्यातील सीमाभागातील महाराष्ट्रातील गावांची चर्चा जोरदार सुरु आहे. पण या गावांना महाराष्ट्रातून वेगळे होण्याची फूस राष्ट्रवादीची असल्याचा गंभीर आरोप शिंदे गटाचे प्रवक्ते नरेश म्हस्के यांनी केला आहे.

काय म्हणाले नरेश म्हस्के? 

राष्ट्रवादी जातीपातीचे राजकारण करून महाराष्ट्रात वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न करत आहे. महाराष्ट्रात काही गावे वेगळे होण्याची भाषा करत आहेत. या गावात याआधी समस्या नव्हत्या का? गावकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यात हे लोक असमर्थ राहिले आहेत. मुख्यमंत्र्यांनी आता पाऊल उचलले. मात्र या गावांना महाराष्ट्रापासून वेगळे करण्यासाठी राष्ट्रवादीकडून फूस लावली जात आहे. राष्ट्रवादी महाराष्ट्र तोडण्याचा डाव आखत आहे.  त्यांना छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव घेण्याचा अधिकार आहे का? असा सवाल त्यांनी केला. तसेच सध्या राजकारणात छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव घेऊन राष्ट्रवादी आणि मित्रपक्ष राजकारण करत आहे. शरद पवारांनी छत्रपती शिवाजी महाराजांना जाणता राजा म्हणण्याची गरज काय? असे विधान केले होते. त्यात शिवाजी महाराजांचा अपमान नाही का? राष्ट्रवादीचे नेते प्रकाश गजभिये यांनी छत्रपतींचा वेष परिधान करून ऐऱ्यागैऱ्यांना मुजरा करत होते. त्यावेळी छत्रपतींचा अपमान झाला नाही का? शाहिस्तेखानाचा देखावा करताना छत्रपती शिवाजी महाराजांना शरद मुखचंद्र लावून राष्ट्रवादीने अधिकृत ट्विट केले होते. छत्रपतींची तुलना पवारांनी केली होती. शरद पवार कधी कोणत्या गडकिल्ल्यावर गेलेत का? सत्तेत गड किल्ल्यांच्या संवर्धनासाठी काय केले? असेही नरेश म्हस्के म्हणाले.
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.