मुलुंडमध्ये आज शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे (Shinde Group Protest) खासदार संजय राऊत यांचे राष्ट्रवादी क्रॉंग्रेसची अंतवस्त्रे घातलेले बॅनर झळकवण्यात आले. संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर केलेल्या टिकेवरून शिंदे गटाकडून राऊत यांच्या विरोधात हे आंदोलन करण्यात आले.
संजय राऊत यांच्या अंतर्वस्त्रावर राष्ट्रवादीच्या घड्याळाचे लोगो दाखवण्यात आले. आज संजय राऊत यांच्या वाढदिवसाच्या दिवशीच शिवसेना शिंदे गटाने आंदोलन करून संजय राऊतांना उत्तर दिलं एवढंच नाही तर त्यांनी राऊतांच्या पोस्टरला जोडे मारून घोषणाबाजी करून राऊतांच्या पोस्टरला जोडे मारले, पोस्टर फाडलं आणि जोरदार घोषणाबाजी करून निषेध नोंदवला.
(हेही वाचा – Rajasthan Assembly Elections : आयारामांमुळे पक्षातील नेत्यांचे टेन्शन वाढले )
संजय राऊत यांच्या घरावर मोर्चा नेण्याचा इशाराही यावेळी शिंदे गटाने दिला आहे. “राज्याच्या मुख्यमंत्र्यांबद्दल अशी अश्लील भाषा करताना तुम्हाला लाज वाटली नाही. तुमच्या अंडरवेअरवर नेमका कुणाचा बिल्ला लागला आहे. मशाल चिन्ह आहे, घड्याळ आहे की हाताचा पंजा आहे? फोडा आणि राज्य करा ही भाजपची नीती आहे म्हणे, संजय राजाराम राऊत यांना थोडी आठवण करून देईन, राज साहेबांनी जेव्हा शिवसेना सोडली, तेव्हा त्यांच्या कार्यकर्त्यांनी तुमची गाडी का फोडली? ठाकरे घरण्यात ज्या काही काड्या आणि भांडण लावत होतात. आता तुमच्या मालकाच्या घरात तेजस आणि आदित्य ठाकरेंमध्ये भांडण कोण लावतंय? कोण काड्या घालतंय?” , असे म्हणत नितेश राणे यांनी राऊत यांच्यावर टीका केली.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community