शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांना ईडीने अटक केली आहे. त्यांच्या घरातून ईडीने साडे अकरा लाख रुपये जप्त केले. त्यातील 10 लाख रुपयांची रक्कम ही एकनाथ शिंदे यांच्या नावार असल्याचे आढळून आले. त्यानंतर विविध चर्चा सुरु झाल्या असताना, शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांनी धक्कादायक माहिती दिली आहे. राऊत हे शिंदे यांच्या विरोधात अयोध्येत जाऊन काही कारवाई करायची असेल म्हणून मी रक्कम असावी, असे केसरकर यांनी म्हटले.
31 जुलैला सकाळी सात वाजण्याच्या सुमारास ईडीने संजय राऊत यांच्या घरावर छापा मारला होता. त्यावेळी त्यांच्या घराची झडती घेण्यात आली. यावेळी ईडीने काही कागदपत्रे आणि साडे अकरा लाख रुपयांची रोकड जप्त केली. त्यातील दहा लाख रुपयांवर ‘एकनाथ शिंदे अयोध्या’ असा उल्लेख असल्याची माहिती आहे. तर उर्वरीत दीड लाख रुपये हे राऊत यांचेच असून घर खर्चासाठी आणले होते, अशीही माहिती समोर आली आहे.
( हेही वाचा: राऊतांच्या अटकेनंतर सामनाच्या अग्रलेखात नेमके काय? राज्यपाल की…? अग्रलेखातून सवाल )
90 टक्के कारवाया या बिल्डरांविरोधात
संजय राऊत यांच्यावर झालेल्या कारवाईबाबत प्रतिक्रिया नोंदवताना, शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांनी सांगितले की, एकनाथ शिंदे यांच्याविरोधात अयोध्येत काही करायचे असेल म्हणून ते पैसे काढले असावेत. ईडीला या पैशांचा स्त्रोत दाखवावा लागणार असून, राऊत हा स्त्रोत दाखवतील, असेही केसरकर यांनी म्हटले. महाराष्ट्रातील ईडीने केलेल्या 90 टक्के कारवाया या बिल्डरांविरोधात असून 10 टक्के कारवाया राजकीय नेत्यांविरोधात असल्याचे केसरकर यांनी म्हटले आहे.
Join Our WhatsApp Community