मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेला मोठा धक्का बसला आहे. सामाजिक न्याय खात्याचे मंत्री संजय शिरसाट यांना सिडको महामंडळाच्या अध्यक्षपदावरून हटविण्यात आले आहे. शिरसाट यांनी मंत्रिपद भूषवत असतानाही सिडको अध्यक्षपदाचा राजीनामा न दिल्यामुळे राज्य सरकारने ही कारवाई केली. (Sanjay Shirsat)
(हेही वाचा- iPhone 16 : आयफोन १६ च्या किमती उतरल्या, आतापर्यंतच्या सगळ्यात कमी किमतीला मिळतोय हा फोन)
नगरविकास विभागाने गुरुवारी यासंदर्भातील शासन निर्णय जारी केला. नियमांनुसार, मंत्रिपद भूषविणाऱ्या व्यक्तीने महामंडळाचे अध्यक्षपद किंवा इतर लाभाचे पद सोडणे अपेक्षित असते. मात्र, मंत्रिमंडळात नियुक्ती होऊन महिना उलटूनही शिरसाट यांनी राजीनामा दिला नव्हता. उलट, त्यांनी सिडको संचालक मंडळाच्या बैठका घेऊन महत्त्वाचे निर्णय घेतल्याने सरकारच्या नियमांचे उल्लंघन केल्याचे आढळून आले. (Sanjay Shirsat)
मुख्यमंत्री फडणवीसांचा निर्णय
ही बाब मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निदर्शनास आल्यानंतर त्यांनी नगरविकास विभागाला शिरसाट यांना पदावरून हटविण्याचे निर्देश दिले. यानंतर गुरुवारी जारी करण्यात आलेल्या शासन निर्णयानुसार, सिडकोच्या आर्टिकल ऑफ असोसिएशनमधील कलम २०२ अंतर्गत शिरसाट यांची अध्यक्षपदावरील नियुक्ती रद्द करण्यात आली. (Sanjay Shirsat)
(हेही वाचा- आविष्कार संशोधन स्पर्धेत Mumbai University ला सलग सहाव्यांदा विजेतेपद)
सिडकोच्या अध्यक्षपदी वर्षभर कार्यकाल
संजय शिरसाट यांची सिडकोच्या अध्यक्षपदी नियुक्ती गेल्या वर्षी सप्टेंबर महिन्यात करण्यात आली होती. मात्र, यंदाच्या मंत्रिमंडळ विस्तारात त्यांना सामाजिक न्याय खात्याची जबाबदारी सोपवण्यात आली. मंत्रीपद स्वीकारल्यानंतर सिडको अध्यक्षपदाचा राजीनामा देणे अपेक्षित होते. परंतु, त्यांनी राजीनामा न देता संचालक मंडळाच्या बैठका घेत महत्त्वाचे निर्णय घेतले. (Sanjay Shirsat)
राजकीय उलथापालथ सुरूच
संजय शिरसाट हे शिंदे गटाचे महत्त्वाचे नेते असून, त्यांची सिडको अध्यक्षपदावरून हकालपट्टी ही शिंदे गटासाठी मोठा धक्का मानली जात आहे. मुख्यमंत्री फडणवीस आणि शिंदे गटातील संबंधांवरही या घटनेचा परिणाम होण्याची शक्यता आहे. (Sanjay Shirsat)
(हेही वाचा- Liquor Scam चे पैसे माजी मंत्र्याने वापरले काँग्रेस भवनाच्या बांधकामासाठी; दरमहा मिळायचे दोन कोटींचे कमीशन)
राज्य सरकारने स्पष्ट केले की मंत्रिपद भूषविणाऱ्या व्यक्तीने लाभाचे पद सोडणे बंधनकारक आहे, त्यामुळे ही कारवाई नियमांनुसार करण्यात आली आहे. यामुळे सिडकोच्या अध्यक्षपदासाठी आता नव्या नियुक्तीची प्रतीक्षा आहे. (Sanjay Shirsat)
हेही पहा-
Join Our WhatsApp Community