- मुंबई प्रतिनिधी
राज्यात लोकसभा निवडणुका पार पडल्यानंतर आता पुन्हा एकदा आमदार-खासदारांच्या घोडेबाजाराच्या चर्चांना उधाण आले आहे. गेल्या चार दिवसांपासून राज्याच्या राजकारणात कोणता आमदार किंवा खासदार फुटणार किंवा कोणाच्या पक्षात जाणार याबाबतची चर्चा सुरू आहे. (Vijay Wadettiwar)
दोन दिवसांपूर्वी शिवसेना (Shiv Sena) शिंदे गटाचे नवनिर्वाचित खासदार नरेश म्हस्के (Naresh Mhaske) आणि शिवसेना ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे (Sushma andhare) यांच्यामध्ये आमदार – खासदारांच्या फोडाफोडीच्या राजकारणावरून जुंपलेली यला मिळाली. अशातच आता विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांनी महिन्याभरात शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेसमधून (Nationalist Congress) फुटलेले ४० आमदार घरवापसी करणार असल्याचा दावा केला आहे. ज्यामुळे आता या मुद्द्यावरून आणखी एका नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे. (Vijay Wadettiwar)
पावसाळी अधिवेशनातील राज्यात मंत्रिमंडळात मोठे फेरबदल होणार असल्याचे म्हटले जात आहे. त्याबरोबरच मागील काही वर्षांपासून अडून राहिलेले महामंडळाचे वाटप देखील केले जाणार आहे. यामुळे पक्षातील आमदारांना तसेच कार्यकर्त्यांना मोठे बळ मिळू शकेल व त्याचा फायदा येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत होणार आहे. परंतु ज्यांना या मंत्रिमंडळात घेतले जाणार नाही किंवा महामंडळे मिळणार नाही अशी नाराज मंडळी पुन्हा एकदा घर वापसी करू शकता. (Vijay Wadettiwar)
हेही पहा-