गुढीपाडव्यानिमित्ताने डोंबिवलीतील शोभायात्रेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे देखील सहभागी झाले होते. यादरम्यान त्यांनी मनसेच्या डोंबिवलीतील मध्यवर्ती कार्यालयाला भेट दिली होती. या भेटीनंतर आता शिवसेना-मनसे युतीच्या चर्चांणा उधाण आले आहे.
डोंबिवलीतील मनसे मध्यवर्ती कार्यालयाला भेट दिल्यानंतर मनसे आणि शिंदेंच्या शिवसेनेची मने जुळली का? असा प्रश्न मनसे आमदार राजू पाटील यांना विचारताच ते म्हणाले की, ‘मन जुळूली, मत जुळली हे आमचे राज साहेब बघतील.’
एकनाथ शिंदे यांच्या कार्यालयाच्या भेटीबाबत राजू पाटील म्हणाले की, सालाबादप्रमाणे इथे कार्यक्रम होता. आज पहिल्यांदा गणपती संस्थानच्या कार्यक्रमाला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आले होते, जे आपल्या ठाणे जिल्ह्यातील आहेत. अशा वेळी राजकीय घडामोडी काहीही असतील किंवा गणित काहीही असतील. परंतु एक संस्कृती असते. मी त्यांना विनंती केली, कार्यालय बाजूला आहे, येता का? त्यावेळीस एका सेकंदाचा वेळ न दडवता, आमच्या विनंतीला मान देऊन ते आले. त्याबद्दल त्यांचेही आभारी आहे. २४ तास १२ महिने कोणी राजकारण करत नाही. काही गोष्टी आपल्या संस्कृतीच्या असतात. सामाजिक सलोख्याच्या पण असतात. आणि मला वाटते, त्याला अनुसरून आपले मुख्यमंत्री आले, त्यांचे आभार मानतो.’
(हेही वाचा – नितीन गडकरी धमकी प्रकरणात मंगळुरुमधून तरुणी ताब्यात; नागपूर पोलिसांचे पथक बेळगावला रवाना)
Join Our WhatsApp Community