Shirur LS Constituency : शिरुरमध्ये उलटे वारे, ठाकरेंच्या नेतृत्वावर विश्वास नसलेल्या कोल्हेंचाच प्रचार करतात उद्धव आणि आदित्य

शिरुर लोकसभा मतदार संघातून सध्या महाविकास आघाडीकडून राष्ट्रवादी कॉंग्रेस शरद पवार गटाचे अमोल कोल्हे हे निवडणूक रिंगणात उतरले आहेत, तर राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने शिवाजी आढळराव पाटील हे निवडणूक लढवत आहेत.

148
Shirur LS Constituency : शिरुरमध्ये उलटे वारे, ठाकरेंच्या नेतृत्वावर विश्वास नसलेल्या कोल्हेंचाच प्रचार करतात उद्धव आणि आदित्य

शिरुर लोकसभा मतदार संघात (Shirur LS Constituency) आता निवडणुकीचे वारे उलटेच फिरायला लागले आहे. या शिरुर लोकसभा मतदार संघात जिथे मागील तीन लोकसभा निवडणुकीत उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे हे आढळराव पाटील यांना विजयी करण्यासाठी प्रचार करत होते, तिथे आता त्याच आढळरावांना पाडण्यासाठी सभा घेत आहेत. तर दुसरीकडे मागील निवडणुकीत ज्या अमोल कोल्हेंना पाडण्यासाठी सभा घेतल्या आता त्याच कोल्हेंना निवडून आणण्यासाठी जीवाचे रान करताना दिसत आहे. (Shirur LS Constituency)

शिरुर लोकसभा मतदार संघातून सध्या महाविकास आघाडीकडून राष्ट्रवादी कॉंग्रेस शरद पवार गटाचे अमोल कोल्हे हे निवडणूक रिंगणात उतरले आहेत, तर राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने शिवाजी आढळराव पाटील हे निवडणूक लढवत आहेत. विशेष म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे उमेदवार अमोल कोल्हे यांनी सन २०१४मध्ये शिवसेनेत प्रवेश करत खऱ्या अर्थाने राजकारणात प्रवेश केला होता. शिवसेना हा छत्रपती शिवरायांच्या विचारांनी चालणारा पक्ष आहे म्हणून तो माझा पक्षा आहे अशी भूमिका मांडत कोल्हे यांनी शिवसेनेत प्रवेश केला होता. शिवसेनेत प्रवेश केल्यांनतर कोल्हे यांना पक्षाचे उपनेते आणि प्रवक्तेपदी नेमणूक करण्यात आली तसेच पुणे जिल्हा संपर्कप्रमुख पदाची जबाबदारी सोपवण्यात आली होती. शिवसेनेच्या काळात त्यांनी तत्कालिन खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या प्रचार यंत्रणेची धुरा वाहिली होती. परंतु शिवसेनेच्या या स्टार प्रचारकाने मार्च २०१९मध्ये शिवसेनेला जय महाराष्ट्र करत राष्ट्रवादी काँग्रेसचे घड्याळ आपल्या हाती बांधले. देशाच्या राजकारणात फार मोठी अस्वस्थता आहे. तरुणाईला योग्य दिशेची गरज आहे. ही जाणीव शरद पवारांसारख्या नेतृत्वामध्ये आहे. त्यामुळे त्यांचे हात बळकट करण्यासाठी मी राष्ट्रवादी पक्षात प्रवेश करत असल्याची भावना कोल्हे यांनी पक्षप्रवेशाच्या वेळी बोलून दाखवली होती. त्यामुळे अप्रत्यक्षपणे तरुणाईला दिशा देण्याची जाणीव हे उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्यामध्ये नसल्याची कबुलीच दिली होती. (Shirur LS Constituency)

परंतु राष्ट्रवादीत प्रवेश केल्यानंतर कोल्हे यांनी २०१९च्या निवडणुकीत शिवसेनेचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या विरोधातच उभे राहिले आणि त्यांचा तब्बल ६० ते ६५ हजार मतांनी पराभव करत त्यांना विजयाच्या हॅट्रीकपासून रोखले. परंतु शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फुटल्यांनतर आढळराव पाटील हे शिवसेनेच्या शिंदे गटात आणि अमोल कोल्हे हे राष्ट्रवादी काँगेसच्या शरद पवार गटात राहिले. मात्र जागा वाटतात हा मतदार संघ महायुतीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाट्याला गेल्याने आढळराव पाटील यांनी तांत्रिकदृष्ट्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करत घड्याळ चिन्हावर निवडणूक लढवत आहे. तर मागील वेळेस घड्याळ चिन्हावर लढणारे कोल्हे हे तुतारी चिन्हावर लढत आहे. मात्र, कोल्हे यांनी शिवसेना ज्या कारणासाठी सोडली आणि ठाकरेंच्या नेतृत्वावर अविश्वास दाखवला, त्याच कोल्हेंच्या विजयासाठी आज उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे हे प्रचार सभा घेऊन त्यांना निवडून आणण्याचे आवाहन करत आहेत. आणि ज्यांच्यासाठी २००९पासून ज्या आढळराव पाटील यांना निवडणून आणण्यासाठी जे ठाकरे झटत होते, तेच ठाकरे आज त्यांना पाडण्यासाठी सभा घेत आहेत. त्यामुळे नियतीने ठाकरेंची अशी अवस्था केली आहे की ज्यांचा ठाकरेंवर विश्वास नाही त्यांचा प्रचार करण्याची वेळ येत आहे. (Shirur LS Constituency)

(हेही वाचा – Trees Poisoning Case : जाहिरात कंपनीला रेल्वेकडून ‘ना हरकत पत्र’, मात्र गुन्हेगार सापडत नाही)

बिबट्याच्या समोर कोल्हे सोडा

महायुतीचे उमेदवार आढळराव पाटील यांच्या प्रचारासाठी अजित पवार यांची सभा शनिवारी पार पडली. या सभेत बोलतांना अजित पवार यांनी स्थानिक मुद्दयाला हात घातला असून या भागात बिबट्यांचा स्वैराचार खूप वाढल्याने लोकांमध्ये अधिक भीती निर्माण झाली आहे. त्यामुळे बिबट्याचा बंदोबस्त करण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. त्यावेळी उपस्थितांमधून एकच आवाज करत बिबट्यांसमोर कोल्हे सोडा अशाप्रकारची मागणी होऊ लागली. मात्र, यावर पवार यांनी हे कोणी वैयक्तिक घेऊ नये असे सांगत तो विषय तिथेच संपवला. (Shirur LS Constituency)

पवारच भिडले

शिरुर विधानसभा मतदार संघातील आमदार अशोक पवार यांचा समाचार घेताना अजित पवार यांनी त्यांना इशारा देत पुन्हा कसा निवडून येतो तेच पाहता असे वक्तव्य केले. यावर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे रोहित पवार यांनी अशोक पवार यांच्या पाठिशी शरद पवार, सुप्रिया पवार तसेच आम्ही आहोत. आम्ही त्यांना निवडून आणू. आम्हीही राजकारणात आहोत. आम्ही काही गोट्या खेळत बसलेलो नाहीत असे प्रत्युत्तर दिले. (Shirur LS Constituency)

  • जुन्नर : अतुल वल्लभ बेनके, राष्ट्रवादी
  • आंबेगाव : दिलीप वळसे पाटील, राष्ट्रवादी
  • खेड आळंदी : दिलीप मोहिते, राष्ट्रवादी काँग्रेस
  • शिरुर : अशोक पवार, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट
  • भोसरी, महेश लांडगे, भाजपा
  • हडपसर : चेतन तुपे, राष्ट्रवादी काँग्रेस (Shirur LS Constituency)

सन २००९ : शिवाजीराव आढळराव पाटील, शिवसेना

सन २०१४ : शिवाजीराव आढळराव पाटील शिवसेना

सन २०१९ : अमोल कोल्हे, राष्ट्रवादी काँग्रेस, शरद पवार गट (Shirur LS Constituency)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.