“मातोश्रीचे लाचार श्री होणाऱ्यांना…” Shishir Shinde गजानन कीर्तिकरांवर का कडाडले?

260
"मातोश्रीचे लाचार श्री होणाऱ्यांना..." Shishir Shinde गजानन कीर्तिकरांवर का कडाडले?

शिवसेना नेते शिशिर शिंदे (Shishir Shinde) यांनी खासदार गजानन कीर्तिकरांची हकालपट्टी करा, अशी मागणी केली आहे. पक्षविरोधी कारवाया केल्याबद्दल पक्षातून हकालपट्टी करण्याची मागणी शिशिर शिंदेंनी एकनाथ शिंदेंकडे केली आहे. खासदार गजानन कीर्तिकर (Gajanan Kirtikar) यांनी आपल्या मनातली खंत बोलून दाखवली होती. शिवाय, गजानन कीर्तिकर यांच्या पत्नीने पक्षविरोधी वक्तव्यं करून विरोधी पक्ष ठाकरे गटाची बाजू घेतली होती. यावरुन शिशिर शिंदे आक्रमक झाले आहेत. (Shishir Shinde)

(हेही वाचा –Pune Porsche Car Accident: “माझा मुलगा मला परत द्या…” अनिसच्या आईचा काळीज पिळवटणारा आक्रोश)

शिशिर शिंदे म्हणाले की, “लोकसभा निवडणुकीत राज्यातील पाचव्या टप्यातील मतदानाच्या दिवशी शिवसेना नेते आणि माजी खासदार गजानन कीर्तिकर यांनी आणि त्यांच्या पत्नीनं पक्षविरोधी वक्तव्यं करून विरोधी पक्ष ठाकरे गटाची बाजू घेतली आहे. त्यामुळे ‘मातोश्रीचे लाचार श्री’ होणाऱ्यांना पक्षातून त्वरीत बाहेरचा रस्ता दाखवावा. शिवसेनेतून हकालपट्टी करावी आणि त्यांना ताबडतोब निरोपाचा नारळ द्यावा. परवा मतदानाच्या दिवशी गजानन कीर्तिकर यांच्या पत्नीनं मुख्यमंत्र्यांचा एकेरी उल्लेख करत ठाकरे गटाची बाजू घेतली होती.गजानन कीर्तिकर यांना मातोश्रीवर लोटांगण घालण्याची घाई झालेली आहे. गजानन कीर्तिकर यांचे हे उद्योग पक्षाला बदनाम करत आहेत. त्यामुळे आता गजानन कीर्तीकर यांची पक्षातून त्वरीत हकालपट्टी करावी.” अशी मागणी शिशिर शिंदे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्याकडे केली आहे. (Shishir Shinde)

काय म्हणाले होते गजानन कीर्तिकर?

लोकसभेची ही निवडणूक अटीतटीची आहे, कारण दोन पक्ष फुटल्यानंतरची ही पहिली निवडणूक आहे. खासदार निवडून येतील, मात्र यामध्ये खरा कोण हे निवडणूक निकालानंतरच स्पष्ट होईल. लोकांचं जनमत कोणाच्या बाजूने हे निवडणुकीतून दिसेल. दीड-दोन वर्षांपूर्वी मी शिंदेंच्या शिवसेनेत गेलो, त्यावेळेला माझे कुटुंबीय विरोध करत होते, पण मी वेगळं मत मांडलं आणि एकटा पडलो. आज मुलासोबत टर्निंग पॉईंटला मी सोबत नव्हतो, याची खंत वाटते, असे म्हणत गजानन कीर्तिकरांनी मनातील खंत बोलून दाखवत पुत्रप्रेमाचा दाखला दिला. यंदाच्या लोकसभा निवडणुकीत माझा फायदा खरं म्हणजे रवींद्र वायकरला मिळाला पाहिजे. मी या निवडणुकीत अमोल किंवा रवींद्र वायकर यांच्या विरोधात भूमिका मांडली नाही. असेही कीर्तिकरांनी म्हटलं आहे. (Shishir Shinde)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.