शिवछत्रपतींचा जिरेटोप मस्तकावर न घालता मस्तकी लावला; CM Devendra Fadnavis यांच्या कृतीचे सर्वत्र कौतुक

131
शिवछत्रपतींचा जिरेटोप मस्तकावर न घालता मस्तकी लावला; CM Devendra Fadnavis यांच्या कृतीचे सर्वत्र कौतुक
शिवछत्रपतींचा जिरेटोप मस्तकावर न घालता मस्तकी लावला; CM Devendra Fadnavis यांच्या कृतीचे सर्वत्र कौतुक

पिंपरी चिंचवडमधील देवाची आळंदी येथे शुक्रवार, ३ जानेवारी रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांनी संत कृतज्ञता कार्यक्रमात सहभाग घेतला. या श्रीरामजन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाचे कोषाध्यक्ष स्वामी गोविंद गिरी महाराज (Govind Dev Giri Ji Maharaj) आणि इतर संत यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा छत्रपती शिवाजी महाराजांची (Chhatrapati Shivaji Maharaj) मूर्ती देऊन आणि जिरेटोप देऊन सन्मान करण्यात केला. या वेळी संतांनी देवेंद्र फडणवीस यांना जिरेटोप डोक्यावर परिधान करण्याची विनंती केली. या वेळी देवेंद्र फडणवीस यांनी जिरेटोप घालण्यास मुख्यमंत्र्यांनी नम्रपणे नकार दिला आणि त्याला मस्तक टेकवून अभिवादन केले. त्यांच्या या कृतीचे सर्वच स्तरातून कौतुक होत आहे.

(हेही वाचा – लडाखवर Chinaचे बेकायदेशीर नियंत्रण भारताला मान्य नाही; परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्याने सुनावले)

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जिरेटोप नम्रपणे नाकारल्यानंतर त्यांच्या ‘एक्स’ अकाऊंटवरून याचा व्हिडिओही (Fadnavis Jiretop Video) पोस्ट केला आहे. जिरेटोपाचा मान शिवछत्रपतींचाच ! रयतेच्या राज्याच्या निर्मितीसाठी या मावळ्याला महाराजांचा आशीर्वादच पुरेसा आहे, असे देवेंद्र फडणवीस यांनी या पोस्टमध्ये म्हटले आहे.

देवेंद्र फडणवीस यांचा जिरेटोप नम्रपणे नाकारल्याचा व्हिडिओ सध्या सोशल मिडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या या पोस्टवरील कमेंट्समध्येही कौतुकाचा वर्षाव होत आहे.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.