संजय राऊत यांच्याविरोधात शिवसैनिक नाराज!

ज्यांनी चार आण्याचे संघटनेचे सदस्यत्व घेतले नाही, ती व्यक्ती जर आम्हाला उपदेश करणार असेल तर आम्ही ते मान्य करणार नाही. पण आज ज्यांनी शिवसेना वाढवली त्यांना बाजूला करत काही कारकुनी नेते जर आपली भूमिका पक्षावर लादत असेल तर कडवट निष्ठावान शिवसैनिक मान्य करणार नाही, असे सांगत एकप्रकारे शिवसेना नेते व प्रवक्ते संजय राऊत यांच्या हस्तक्षेपाबाबत तीव्र नाराजी आता व्यक्त होताना दिसत आहे.

…म्हणून राऊत यांच्यावर शिवसैनिक नाराज

शरद पवार यांनी मुख्यमंत्री असताना शिवसेनेच्या शाखांवर बुलडोझर चढवले होते, हे आम्ही शिवसैनिक विसरलेलो नाही, असे सांगत काही शिवसैनिकांनी राष्ट्रवादी काँग्रेसशी केलेल्या हातमिळवणी बाबत तीव्र नाराजी व्यक्त केली. राऊत यांचे शिवसेना पक्ष संघटनेत योगदान काय? जेव्हा शिवसेना बाळासाहेब वाढवत होते, तेव्हा हे राऊत पत्रकार म्हणून लेखण्या झिझवत होते. त्यांनी शिवसेना कुठे वाढवली. शिवसेनेचे सदस्यत्व तरी त्यांनी घेतले काय?

(हेही वाचा – एकनाथ शिंदेंसह आमदारांनी घेतलेली भूमिका योग्यच; शिवसैनिकांमधील खदखद पडतेय बाहेर )

बाळासाहेबांनी त्यांना खासदार केले, पण त्यावेळी ते कधीही पक्षात सक्रिय नव्हते. आज त्यांनाही आम्ही मानतो. पण जेव्हा हाडाच्या शिवसैनिकाला, निष्ठावंतांना बाजूला डावलून जेव्हा शिवसेना म्हणजे मीच, आणि मीच सांगेन ती पूर्व दिशा असे सांगत शरद पवार यांच्या दावणीला बांधण्याचा जो काही प्रयत्न त्यांच्याकडून होत आहे, त्यामुळे राऊत यांच्यावर शिवसैनिक नाराज आहे. कधीही संघटनेसाठी न झटणारी व्यक्ती जेव्हा बोलण्यास पुढे येते आणि ती व्यक्ती जर आम्हाला उपदेश करत असेल तर आम्ही शिवसैनिक ते सहन करणार नाही, अशाही संतप्त भावना व्यक्त केल्या जात आहेत.

तर आज शिवसेनेला चांगले दिवस दिसले असते

या शिवसैनिकांच्या व्यथा आहे. बाळासाहेबांनी आयुष्यभर जे विचार आणि तत्व जपत संघटना वाढवली, त्यांचे विचार जो पुढे घेऊन जाणारा शिवसेना पक्ष हवा आहे. आज शिंदे यांनी हिंमत दाखवली, पण तेच खरे बाळासाहेबांचा विचार पुढे नेणारे आहेत. शिंदे यांची पद्धत योग्यच आहे. बाळासाहेबांना अभिप्रेत असेच अशीच त्यांची भूमिका आहे. पण शिंदे यांनी बोलण्यास खूप उशीर केला आहे. दोन वर्ष आधी बोलले असते तर आज शिवसेनेला चांगले दिवस दिसले असते, असेही शिवसैनिकांचे म्हणणे आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here