अनिल परबांच्या विरोधात पक्षांतर्गत नाराजी! रत्नागिरीत शिवसेना पदाधिकारी संतापले

142

शिवसेना नेते, परिवहन मंत्री आणि रत्नागिरीचे पालकमंत्री अनिल परब यांना पालकमंत्री पदावरून हटवण्यात यावे, अशी मागणी आता खुद्द शिवसेनेमधून होऊ लागली आहे. रत्नागिरीतील ५ तालुक्यांमधील शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी ही मागणी केली आहे. त्यामुळे अनिल परबांच्या विरोधात तीव्र नाराजीचा सुरु दिसत आहे.

परब रत्नागिरीत राजकारण करण्यासाठी येतात

चिपळूणमध्ये शिवसेनेच्या शिवसंपर्क अभियानाच्या अंतर्गत बैठक झाली. अनिल परब हे राष्ट्रवादीला जास्त कामे देतात आणि शिवसेनेला डावलतात, अशी तक्रार करत शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी अनिल परब यांच्याविरोधात दंड थोपटले आहेत. या बैठकीत चिपळूण, गुहागर, खेड, दापोली आणि मंडणगड या पाच तालुक्यातील शिवसेनेचे पदाधिकारी उपस्थित होते. अनिल परब हे रत्नागिरीत केवळ झेंडा वंदन आणि राजकारण करण्यासाठी येत असतात, असाही आरोप या शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी केला आहे.

(हेही वाचा पूजा सिंघलांच्या डायरीत बड्या नेत्यांची नावे! धक्कादायक खुलासे होणार )

परबांविरोधात पक्षांतर्गतही नाराजी

अनिल परब हे शिवसेनेतील वरिष्ठ नेते आहेत, तसेच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे निकटवर्ती आहेत. त्यांच्यावर दापोलीत बेकायदा रिसॉर्ट बांधल्याचा आरोप झाला आहे. या प्रकरणी भाजप नेते किरीट सोमय्या यांनी तक्रार दाखल केली आहे. तसेच माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर असलेल्या खंडणीच्या गुन्ह्यामध्ये सहभाग असल्याचा आरोप झाला आहे. त्यामुळे आधीच अडचणीत आलेल्या परबांची आता पक्षांतर्गतही नाराजी निर्माण झाल्याचा आरोप होत आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.