विनायक मेटेंचा ड्रायव्हर एकनाथ कदम पोलिसांच्या ताब्यात! होणार चौकशी

170

शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे यांच्या गाडीला मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर अपघात झाला. यामध्ये त्यांचे अपघाती निधन झाले. मेटे यांच्या मृत्यूनंतर काही नेत्यांनी अपघाताबाबत शंका उपस्थित केली आहे. या अपघातात मेटेंचा जागीच मृत्यू झाला तर त्यांचा बॉडीगार्ड देखील गंभीररित्या जखमी झाला आहे. या अपघातात मेटे यांच्या गाडीचा ड्रायव्हर एकनाथ कदम सुदैवाने बचावला असून तो सुखरूप आहे. मात्र त्याची चौकशी केली जाणार आहे.

(हेही वाचा – शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे यांचं अपघाती निधन, मराठा आरक्षण आंदोलनाचा आवाज हरपला)

दरम्यान, विनायक मेटे यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. याप्रकरणी ड्रायव्हर एकनाथ कदम याची चौकशी केली जाणार आहे. रसायनी पोलीस या अपघाताचा तपास करत आहे. तर नवी मुंबई पोलीसांनी त्याची वैद्यकीय तपासणी केल्यानंतर त्याला रसायनी (रायगड जिल्हा) पोलीसांच्या हवाली करण्यात आले आहे.

दरम्यान, या ड्रायव्हरचा पोलीस जबाब नोंदवणार असून रसायनी पोलिसांकडून चौकशी सुरू आहेत. पोलीस चालकाकडून अपघाताचा तपशील पडताळून पाहणार आहेत. रसायनीमध्ये त्याची मेडिकल करण्यात येणार असल्याचे सांगितले जात आहे. तर विनायक मेटे यांचा अपघात झाला त्या ठिकाणच्या आसपासचे सीसीटीव्ही कॅमेरे पोलीस चेक करणार आहेत. गाडीला अपघात होण्याच्या आधी आणि नंतरची वेळ तपासली जाणार आहेत. त्या ठिकाणाहून गेलेल्या गाड्यांना कोणत्या प्रकारचे अपघाताचे निशान आहेत का? हे देखील तपासण्यात येत आहेत.

अपघातानंतर तासभर कोणाचीही मदत नाही

दरम्यान, बीडकडून आम्ही मुंबईकडे जात असताना हा अपघात झाला. आम्हाला एका ट्रकने कट मारला असल्याचे मेटे यांचे सहकारी एकनाथ कदम यांनी सांगितले तर हा प्रकार घडल्यानंतर बराच वेळ मदत मागण्याचा प्रयत्न केला पण कोणतीही मदत मिळाली नसल्याचा आरोप त्यांनी केला आहे. 100 नंबरला आम्ही फोन केला मात्र त्यांनी फोन उचलला नाही. मदतीसाठी मी प्रत्येकाला विनवणी करत होतो मात्र कुणीही गाडी थांबवली नाही. मी रोडवर झोपलो होतो, आम्ही गाड्यांना हात करत होतो, मग एका गाडीवाल्यानं गाडी थांबवली आणि आम्हाला मदत केली. एका तासानंतर तिथे अॅम्ब्युलन्स पोहोचली. अपघातानंतर मी मेटे यांच्याशी बोलत होतो तेव्हा ते माझ्याशी संवाद साधत होते, असेही एकनाथ कदम यांनी सांगितले आहे.

Join Our WhatsApp Community

Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.