सिंधुदुर्ग जिल्हा बँक निवडणुकीचे मतदान पूर्ण होताच शिवसेना आणि भाजपा बूथ वरील कार्यकर्त्यांमध्ये घोषणायुद्ध रंगले. शिवसैनिकांनी मतदान संपल्यावर फटाके वाजवून विजयाचा विश्वास व्यक्त करून शिवसेनेच्या विजयाची घोषणाबाजी केली. त्याला प्रत्युत्तर म्हणून भाजपा कार्यकर्त्यानी भाजपा विजयाच्या घोषणा दिल्या. भाजपा कार्यकर्त्यानी ‘म्याव म्याव’च्या घोषणा देताच शिवसैनिकांनी ‘बाबा मला वाचवा कॉक कॉक कॉक कॉक’ अशा घोषणा दिल्या. आता कसे वाटतंय गार गार वाटतंय अशा घोषणा दिल्या.
कणकवलीत कडेकोट पोलीस बंदोबस्त
दरम्यान पोलिसांनी हस्तक्षेप करून कार्यकर्त्यांना शांत केले, दोन्ही बाजूंकडून विजयाचा दावा करण्यात आला आहे. उद्या ३१ डिसेंबर रोजी ओरोस येथे जिल्हा बँक निवडणुकीची मतमोजणी होणार आहे. कणकवलीत कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
(हेही वाचा – …तर भाजपा खटला दाखल करणार, फडणवीसांचा इशारा)
महाविकासकडून सूडाने कारवाई होतेय…
नितेश राणेंचा पोलिसांकडून शोध सुरू आहे. तर नारायण राणेंना नोटीस बजावून चौकशीला बोलवल्याने भाजप नेते चांगलेच आक्रमक झाले आहेत. महाविकास आघाडीकडून ही कारवाई केवळ सूडाने होत असल्याचा आरोप भाजपाकडून करण्यात येत आहे. तर दुसरीकडे नितेश राणेंना कुठूनही शोधून काढू, असे विधान संजय राऊत यांनी केले. यानंतर राजकीय क्षेत्रात आणखी खळबळ उडाली. तर संतोष परब हल्ला प्रकरणी संपर्काच्या बाहेर असलेले भाजप आमदार नितेश राणे यांच्या जामीन अर्जावर सुनावणी होत आहे, गेल्या दोन तीन दिवसांपासून रोज जामीन अर्जावर सुनवाणी होत आहे, मात्र कोर्टाने अद्याप कोणताही निर्णय दिला नाही.
Join Our WhatsApp Community