गेल्या अनेक दिवसांपासून शिवसेनेच्या ठाकरे गटाची आणि वंचित बहुजन आघाडीच्या युतीची जोरदार चर्चा रंगली आहे. ही युती कधी जाहीर होते? याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. यादरम्यानच शिवसेनेचे नेते सुभाष देसाई यांनी युतीच्या घोषणेबाबतचा संकेत दिला आहे. शिवसेनेच्या ठाकरे गटाची आणि वंचित बहुजन आघाडीच्या युतीची घोषणा सोमवारी, २३ जानेवारीला होण्याची शक्यता आहे, अशी माहिती देसाई यांनी दिली आहे. ‘मनातून सगळं ठरलं आहे, आता फक्त घोषणा बाकी असल्याचं’, सुभाष देसाई माध्यमांसोबत बोलताना म्हणाले.
सुभाष देसाई नक्की काय म्हणाले?
सुभाष देसाई म्हणाले की, ‘शिवसेना आणि वंचित बहुजन आघाडीच्या युतीबाबत सोमवारी घोषणा होण्याची शक्यता आहे. लवकरच याबाबत चांगली घोषणा होईल. दोन्ही मोठे पक्ष एकत्र येताना त्यात बरीच प्रक्रिया असते, चर्चा व्हाव्या लागतात. अनेक मुद्द्यांची गोष्ट आहे, त्यांच्यावर चर्चा झालेली आहे. मनातून सगळं ठरलेलं आहे.’
अजूनही मविआत होतेय चर्चा
दरम्यान युतीच्या घोषणेबाबत वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर म्हणाले की, ‘शिवसेना आणि वंचित आघाडीच्या युतीबाबत बोलणं झालं असून उद्धव ठाकरेंनी युतीची घोषणा करावी अशी आमची भूमिका आहे. पण सध्या युतीबाबत ठाकरे गट आणि काँग्रेस, राष्ट्रवादीत चर्चा सुरू आहे. सर्वांनी एकत्र मिळून युतीबाबत घोषणा करावी, असं उद्धव ठाकरेंचं मत आहे.’
(हेही वाचा – ‘आजवर उद्धव ठाकरेंनी कोणत्याही नेत्याला मोठे होऊ दिले नाही, संजय कदमांची ही राजकीय आत्महत्या’)
Join Our WhatsApp Community