उत्तर प्रदेशातही फडकणार शिवसेनेचा भगवा?

शिवसेनेने उत्तर प्रदेशमधील 403 जागांवर निवडणूक लढवण्याची घोषणा केली असून, तसे पत्रकच शिवसेनेने काढले आहे.

68

महाराष्ट्रात शिवसेनेचा मुख्यमंत्री झाल्यानंतर शिवसेना चांगली आक्रमक झाली असून, आता उत्तर प्रदेशमध्ये देखील शिवसेनेने निवडणूक लढवण्याचा निर्धार केला आहे. शिवसेनेने उत्तर प्रदेशमधील 403 जागांवर निवडणूक लढवण्याची घोषणा केली असून, तसे पत्रकच शिवसेनेने काढले आहे. सगळ्यात महत्वाचे म्हणजे
पत्रकामधून शिवसेनेने उत्तर प्रदेशमधील योगी आदित्यनाथ सरकावर टीका केली आहे. राज्यामध्ये शिक्षण, रोजगार, कायदा-सुव्यवस्था यांसारखे प्रश्न सध्या सत्तेत असणाऱ्या भाजपाच्या कार्यकाळात निर्माण झाल्याची टीका शिवसेनेने केली आहे.

भाजपवर टीका

१० सप्टेंबर रोजी लखनऊमधील हरतगंज येथे पक्षाच्या उत्तर प्रदेशमधील नेत्यांची बैठक पार पडली. आगामी विधानसभा निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर पक्ष संघटना आणि पक्षाची वाटचाल कशी असणार यासंदर्भात या बैठकीमध्ये चर्चा झाली. यावेळी उत्तर प्रदेशमधील शिवसेनेचे प्रमुख नेते ठाकूर अनिल सिंह यांनी उत्तर प्रदेश सरकारवर टीका करताना, उत्तर प्रदेश सरकारमध्ये कायदा-सुव्यवस्था सक्षम नसल्याची परिस्थिती आहे, अशी टीका केली. उत्तर प्रदेशमध्ये जंगलराज सुरू असून महिला आणि मुलींवर अत्याचार होत असल्याची टीका ठाकूर यांनी केली.

(हेही वाचाः फडणवीस निघाले गुजरातला, मुख्यमंत्रीपदाची शपथ घ्यायला! फडणवीस होतायेत ट्रोल!)

सरकार शिक्षणसम्राटांच्या बाजूने

शिवसेनेने जारी केलेल्या पत्रामध्ये, सरकार ब्राह्मणांविरोधात गैरव्यवहार करत आहे. राज्यामध्ये आरोग्य व्यवस्थेची परिस्थिती फारच वाईट आहे. कोरोना रुग्णांच्या मृतदेहांवर अत्यंसंस्कार करण्यासाठी सामान उपलब्ध होत नाही, अशी परिस्थिती आहे. बंद असणाऱ्या शाळाही राज्यामधील विद्यार्थ्यांकडून हव्या तशा पद्धतीने फी घेताना दिसत आहेत, सरकार शिक्षणसम्राटांच्या बाजूने आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतरही विद्यालयांमधील फी १५ टक्क्यांनी कामी करण्यात आलेली नाही. महाराष्ट्र सरकारने कायदा बनवून विद्यार्थ्यांना १५ टक्के फी सवलत दिली आहे.

सत्ताधा-यांवर निशाणा

उत्तर प्रदेशमध्ये बेरोजगारी आणि महागाईमुळे तरुण मुलं राज्य सोडून जात आहेत. सरकार शेतकरी आणि तरुणांसोबत सावत्र असल्याप्रमाणे व्यवहार करत आहे, असे आरोप करत शिवसेना नेत्यांनी सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला.

(हेही वाचाः महाराष्ट्रातून मी निघून गेल्यास राज्याचेच नुकसान! सांगलीत राज्यपालांची फटकेबाजी )

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.