शिवसेनेने अखेर कोल्हापूर जिल्हाप्रमुख संजय पवार यांना राज्यसभेची उमेदवारी जाहीर केली आहे. छत्रपती संभाजी राजे आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यात सविस्तर बैठकही झाली होती. पाठिंबा मिळण्यासाठी संभाजी राजेंनी छत्रपती घराण्याचा दाखलाही दिला होता. छत्रपती घराण्याचा मुख्यमंत्री सन्मान करतील,असा छत्रपतींना विश्वास होता. काही दिवसांपासून राज्यसभेच्या 6 व्या जागेसाठी सस्पेन्स होता. आता हा सस्पेन्स शिवसेनेने संपवला आहे. शिवसेना नेते संजय राऊत यांनी कोल्हापूरचे शिवसेना जिल्हा प्रमुख संजय पवार यांना उमेदवारी दिल्याचे जाहीर केले आहे.
कोण आहेत संजय पवार
संजय पवार हे शिवसेनेचे कोल्हापूरचे जिल्हा प्रमुख आहेत. गेल्या 25 ते 30 वर्षापासून ते शिवसेनेत कार्यरत आहेत. ग्रामीण भागातील कणखर नेतृत्व म्हणून संजय पवार यांच्याकडे पाहिले जाते. ग्रामीण भागातील उमेदवार पाठवण्याचे शिवसेनेने यावेळी ठरवले आहे. त्यादृष्टीकोनातून सर्वसामान्य शिवसैनिकाला संधी देण्याच शिवसेनेचा प्रयत्न आहे. संजय पवार गेले वर्षे कट्टर शिवसैनिक असणा-या संजय पवारांचे नाव राज्यसभेचा उमेदवार म्हणून आल्याने, शिवसेनेने धक्कातंत्राचे राजकारण केले आहे.
( हेही वाचा: कोरोना संकटामुळे देशातील गरीब तब्बल 30 वर्षे गेलाय मागे; अहवालातील निष्कर्ष )
Join Our WhatsApp Community