शिवसेनेच्या वर्धापन दिनी मुख्यमंत्रीही भाजपला झोडणार?

भाजपकडून शिवसेनेवर टीका सुरू झाली आहे. या टीकेला देखील उद्धव ठाकरे उत्तर देणार का?

89

शिवसेना… मराठी माणसाच्या न्याय्य हक्कांसाठी स्थापन झालेली शिवसेना आता 55 वर्षांची होत असून, शनिवारी शिवसेनेचा 55वा वर्धापन दिन साजरा होत आहे. शिवसेनेचा यंदाचा वर्धापन दिन नेमका कसा असणार, याची शिवसैनिकांना उत्सुकता लागली होती. पण यंदाही शिवसेना आपला वर्धापन दिन साधेपणाने साजरा करत आहे. गेल्यावर्षी प्रमाणे यंदाही कोरोनाचे संकट असल्याने यावर्षीही व्हर्च्युअल पद्धतीने वर्धापन दिन साजरा करण्याचा निर्णय, शिवसेनेने घेतला आहे. यावेळी शिवसैनिकांना मार्गदर्शन करताना शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे, भाजपचा चांगलाच समाचार घेणार असल्याचे कळत आहे. 

(हेही वाचाः भाजपचा शिवसेनेविरोधात फटकार मोर्चा! सेना भवनसमोर राडा)

फेसबुकवरुन शिवसैनिकांना मार्गदर्शन

महाराष्ट्राच्या विधानभवनावर पुन्हा एकदा भगवा फडकल्यानंतरचा हा शिवसेनेचा दुसरा वर्धापन दिन आहे. कोरोनाचे संकट आणि लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर हा वर्धापनदिन नेहमीच्या जोश, जल्लोषाविना साजरा होणार आहे. मात्र, शिवसेनेचे पक्षप्रमुख व राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे शिवसैनिकांना व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे मार्गदर्शन करणार आहेत. शनिवारी संध्याकाळी सात वाजता मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे शिवसैनिकांशी संवाद साधणार आहेत.

(हेही वाचाः भाजपला शिवप्रसाद मिळाला, शिवभोजन देण्याची वेळ आणू नका! )

सेनाभवन वरील राड्याबाबत बोलणार?

शिवसेना आणि भाजप कार्यकर्त्यांमध्ये सेना भवन परिसरात झालेल्या राड्यावर मुख्यमंत्री बोलणार असल्याची माहिती मिळत आहे. गुरुवारीच उद्धव ठाकरे यांनी सेना भवन समोर झालेल्या बाचाबाचीत सहभागी असलेल्या आपल्या शिवसैनिकांचे कौतुक केले होते. त्यामुळे शनिवारी वर्धापन दिनाच्या दिवशीही ते शिवसैनिकांना मार्गदर्शन करताना याबाबत काहीतरी बोलणार असल्याचे समजते. एवढेच नाही तर राम मंदिर मुद्द्यावर देखील मुख्यमंत्री भाष्य करणार आहेत.

(हेही वाचाः ‘त्या’ शिवसैनिकांचा मुख्यमंत्र्यांकडून सत्कार! )

भाजपला देणार उत्तर?

मुंबई महापालिकेची निवडणूक अवघ्या काही महिन्यांवर आलेली असताना, भाजपकडून शिवसेनेवर टीका सुरू झाली आहे. या टीकेला देखील उद्धव ठाकरे उत्तर देणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. गेली सुमारे ५० वर्षे राजकीय विरोधक राहिलेल्या काँग्रेसशी शिवसेनेनं आघाडी केल्याने शिवसेनेमध्ये सध्या उलटसुलट चर्चा आहे. शिवसेनेच्या विरोधकांकडून काही प्रमाणात भ्रमही निर्माण केले जात आहेत. या सगळ्यांवर उद्धव ठाकरे नेमकं काय बोलणार, याबाबत उत्सुकता आहे.

(हेही वाचाः शिवसेना आमदाराने कॉन्ट्रॅक्टरला झोडले… पण स्वतः कोरोनाचे नियम तोडले)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.