एकनाथ शिंदे यांनी पुकारलेलं बंड हा महाराष्ट्राच्या इतिहासातला एक क्रांतिकारी निर्णय असल्याचे बोलले जात आहे. शिंदे यांच्या या बंडामुळे राज्यात रिश्टर स्केलमध्येही मोजता येणार इतका भयंकर राजकीय भूकंप झाला आहे. काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत असलेली आघाडी मोडा, अशी मागणी शिंदे गटाकडून करण्यात येत आहे. पण शिंदेंच्या या बंडाआधीच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे एकनाथ शिंदे यांना पक्षाबाहेरचा रस्ता दाखवणार होते, अशी धक्कादायक माहिती राजकीय सूत्रांकडून मिळत आहे.
बंडाच्या एक वर्ष आधीच…
शिवसेनेने भाजपशी काडीमोड घेत 2019 मध्ये काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत संसाराला सुरुवात केली. पण तरीही एकनाथ शिंदे हे भाजपसोबत जवळीक साधून होते, जे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पटत नव्हते. यामुळे या बंडाच्या एक वर्ष आधीच उद्धव ठाकरे हे एकनाथ शिंदे यांना नारळ देऊन शिवसेनेची दारं एकनाथ शिंदे यांच्यासाठी बंद करणार होते, अशी माहिती सूत्रांकडून मिळत आहे.
(हेही वाचाः मुख्यमंत्र्यांनी मागवल्या शिंदेंच्या खात्याच्या फायली)
‘धर्मवीर’नंतर मतभेद वाढले
तसेच एकनाथ शिंदे यांचे पंख छाटण्यासाठी सुद्धा शिवसेनेकडून प्रयत्न करण्यात येत असल्याची माहिती एकनाथ शिंदे यांच्या निकटवर्तीयांकडून मिळत आहे. जर मुख्यमंत्र्यांचं आजारपण आलं नसतं तर एकनाथ शिंदे यांना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे शिवसेनेतून अपमानित करुन बाहेर काढणार होते. धर्मवीर सिनेमानंतर उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्यातील मतभेद जास्तच वाढल्याची धक्कादायक माहितीही सूत्रांनी दिली आहे.
Join Our WhatsApp Community