निवडणूक आयोगाने शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण हे पक्षचिन्ह गोठवलं या निर्णयामुळे उद्धव ठाकरेंना मोठा धक्का देण्यात आल्याच्या चर्चा सुरू आहे. निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार, शिंदे आणि ठाकरे गटाला शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण हे निवडणूक हे चिन्ह वापरता येणार नाही. दोन्ही गटांना त्यांच्या पक्षाचे नाव आणि निवडणूक चिन्हाबाबत पर्याय देण्याच्या सूचना आयोगाने दिल्या होत्या. त्यानुसार आता उद्धव ठाकरेंनी आपल्या पक्षाच्या चिन्हासाठी तीन पर्याय निवडणूक आयोगाकडे दिले असल्याची माहिती शिवसेना खासदार अरविंद सावंत यांनी दिली आहे.
(हेही वाचा – “धनुष्यबाण चिन्ह निवडणूक आयोगाने गोठवलं हा निर्णय अपेक्षितच होता, कारण…”)
उद्धव ठाकरेंनी निवडणूक आयोगाला पत्र लिहीत काही नावे आणि काही चिन्हांचा प्रस्ताव ठेवला आहे. उद्धव ठाकरेंनी निवडणूक आयोगाला पक्षचिन्हासाठी त्रिशूळ, उगवता सूर्य, मशाल हे तीन पर्याय दिले आहेत, असे माध्यमांशी बोलताना अरविंद सावंत यांनी सांगितले. तर पक्षांच्या नावासाठी शिवसेना बाळासाहेब ठाकरे, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे ही दोन नावे दिल्याचे सावंत यांनी स्पष्ट केले आहे.
ECI froze our election symbol. They asked us to give symbols, Uddhav Thackeray gave three symbols, 'trishul', 'mashaal' & 'rising sun' to ECI. ECI will decide & allot the symbol now: Shiv Sena (Uddhav faction) MP Arvind Sawant on party symbol pic.twitter.com/aEoXKdPO2U
— ANI (@ANI) October 9, 2022
दरम्यान, निवडणूक आयोगाचा निर्णय शनिवारी रात्री जाहीर झाल्यानंतर उद्धव ठाकरे व एकनाथ शिंदे या दोन्ही गटात जोरदार हालचाली सुरू झाल्यात. यासह राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झाडत आहेत. शिवसेनेने निवडणूक आयोगाकडे मशाल, उगवाता सूर्य आणि त्रिशुळ या तीन चिन्हांपैकी एक चिन्ह द्यावं, अशी मागणी केली आहे. त्यामुळे आता शिवसेनेला कोणतं चिन्ह मिळणार, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
Join Our WhatsApp Community