Balasaheb Thackeray : स्मृतीस्थळावर ठाकरे-शिंदे गटातील राड्यानंतर ; पोलीस अॅक्शन मोडमध्ये

बाळासाहेब स्मृती स्थळावर झालेल्या राड्यावरून पोलीस गुन्हे दाखल करणार आहेत.

138

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा शुक्रवारी (१७ नोव्हेंबर) ११ वा स्मृतीदिन आहे. त्यामुळे देशभरातील बाळासाहेबांचे चाहते आणि शिवसैनिक बाळासाहेबांना अभिवादन करण्यासाठी शिवतीर्थावर (छत्रपती शिवाजी महाराज पार्क, दादर) येथे येतात. याच दरम्यान पाहणी करण्यासाठी आलेले शिवसेना शिंदे गट आणि ठाकरे गटाचे कार्यकर्ते भिडले. दोन्ही बाजूंनी धक्काबुक्की आणि घोषणाबाजी झाली. जवळपास तीन-साडेतीन तास शिवाजी पार्क परिसरात गोंधळ सुरू होता.त्यानंतर शुक्रवारी सकाळपासूनच शिवतीर्थावर मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला असल्याचे पाहावयास मिळाले. एकंदरच कालच्या घटनेनंतर पोलीस अॅक्शन मोडमध्ये आले आहेत. (Balasaheb Thackeray)

बाळासाहेब स्मृती स्थळावर झालेल्या राड्यावरून पोलीस गुन्हे दाखल करणार आहेत. पोलीस सर्व घटनाक्रम तपासून गुन्हे नोंदवणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. बाळासाहेब स्मृतीस्थळावर नक्की काय घडलं याबाबत आजूबाजूला असलेल्या सीसीटीव्ही आणि रेकॉर्डिंगवरून चौकशी करणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. तर या घटने नंतर बाळासाहेब ठाकरे स्मृतीस्थळ परिसरात झालेल्या राड्याच्यावेळी पोलिसांनी कारवाई करा अशी मागणी शिंदे गटाकडून करण्यात आली होती. पोलिसांनी कारवाईचे आश्वासन दिल्यानंतर शिंदे गटाचे कार्यकर्ते आणि नेते स्मृतीस्थळावरून परतले होते.तर,दुसरीकडे शिंदे गटाच्या नेते, कार्यकर्त्यांचे या ठिकाणी काम नाही. आम्हाला स्मृतीदिनाच्या कार्यक्रमाची तयारी करायची असल्याचे ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी म्हटले. ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी स्मृतीस्थळाजवळ ठिय्या मारला होता.

(हेही वाचा : Diwali : नवरात्री ते दिवाळी काळात १२ हजार ६०० घरांची विक्रमी विक्री)

नेमका कशावरून झाला वाद
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे गुरुवारी, १६ नोव्हेंबर रोजी दादर परिसरात होते. त्यानंतर सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, शिंदे गटाचे स्थानिक आमदार सदा सरवणकर, शिंदे गटाचे प्रवक्ते नरेश म्हस्के, शीतल म्हात्रे आदी दिवगंत शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळावर अभिवादन करण्यास दाखल झाले होते. त्यानंतर काही वेळाने शिवसेना ठाकरे गटाच्या शिवसैनिकांनी घोषणाबाजी केल्याचा आरोप शिंदे गटाने केला आहे.

शिंदे गटाचा आरोप काय?
ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी महिला कार्यकर्त्यांना धक्काबुक्की केली असल्याचा आरोप शिंदे गटाच्या प्रवक्त्या शीतल म्हात्रे यांनी केला. ठाकरे गटाने घोषणाबाजी, धक्काबुक्कीला सुरुवात केली असल्याचे म्हात्रे यांनी म्हटले.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.