Shiv Sena : शिवसेनेच्या मंत्री आणि आमदारामध्ये धक्काबुक्की; मुख्यमंत्र्यांनी धरले मौन

हा वाद झाल्यानंतर शिवसेना आमदार आणि मंत्र्यांकडून वाद झालाच नाही, असा दावा करण्यात येत आहे. शंभूराज देसाई यांनी हा वाद झाल्याचा पुरावा काय? असा मीडियाला प्रश्न केला.

372
Shiv Sena : शिवसेनेच्या मंत्री आणि आमदारामध्ये धक्काबुक्की; मुख्यमंत्र्यांनी धरले मौन

राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सध्या सुरु आहे. आज म्हणजेच शुक्रवार १ मार्च हा या अधिवेशनाचा पाचवा आणि शेवटचा दिवस आहे. मात्र आज विधानसभेच्या लॉबीमध्ये शिवसेना (Shiv Sena) मंत्री आणि आमदार यांच्यात धक्काबुक्की झाली. त्यामुळे एकच खळबळ उडाली.

(हेही वाचा – Anurag Thakur : ‘देशातील ॲथलीटना देणार डिजिटल कार्ड,’ – अनुराग ठाकूर)

नेमकी घटना काय ?

मंत्री दादा भुसे (Dada Bhuse) आणि आमदार महेंद्र थोरवे यांनी एकमेकांना धक्काबुक्की केली. या धक्काबुक्कीमुळे एकच खळबळ उडाली. धक्काबुक्की सुरू झाल्यानंतर मंत्री शंभूराज देसाई आणि भरत गोगावले यांना मध्यस्थी करावी लागली. दरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे महेंद्र थोरवे आणि दादा भुसे यांना ऊन कार्यालयामध्ये गेले. (Shiv Sena)

मुख्यमंत्र्यांनी धरले मौन :

अशातच या वादाबद्दल मुख्यमंत्री शिंदे यांना विचारले असता त्यांनी प्रतिक्रिया देणं टाळलं. “अरे काय तर काय विचारताय? अधिवेशनातील कामाचे विचारा,” अशी प्रतिक्रिया देत एकनाथ शिंदे यांनी या वादावर भाष्य करण्यास टाळाटाळ केली. (Shiv Sena)

(हेही वाचा – Indian Railway : १ मेपासून देशभरात रेल्वे होणार ठप्प; कारण…)

धक्काबुक्कीचा पुरावा काय?

दरम्यान, हा वाद झाल्यानंतर शिवसेना (Shiv Sena) आमदार आणि मंत्र्यांकडून वाद झालाच नाही, असा दावा करण्यात येत आहे. शंभूराज देसाई यांनी हा वाद झाल्याचा पुरावा काय? असा मीडियाला प्रश्न केला. ते म्हणाले की, “बोलताना कोणाचा आवाज वाढला म्हणजे वाद झाला असं नाही. योगायोगाने मी तिथे होतो. एकमेकांच्या अंगावर जाणं असं बिलकुल काही घडलेलं नाही.”

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.