महापालिकेतही शिंदेंची ‘मेजॉरिटी’, नगरसेवक करणार समर्थनार्थ शक्ती प्रदर्शन

एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेविरोधात पुकारलेल्या बंडानंतर शिवसेनेला मोठे खिंडार पडले आहे. शिवसेनेचे तब्बल 46 आमदार आपल्यासोबत असल्याचे एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे. एकनाथ शिंदे यांना एवढ्या मोठ्या प्रमाणात आमदारांचे समर्थन असल्यामुळे शिवसेनेकडे फक्त हाताच्या बोटावर मोजण्याइतकेच आमदार राहिले आहेत.

असे असतानाच आता शिवसेनेच्या ठाण्यातील नगरसेवकांनी देखील त्यांच्या समर्थनार्थ शक्ती प्रदर्शन करण्याचे ठरवले आहे. ठाणे महापालिकेतील तब्बल 50 नगरसेवक एकनाथ शिंदे यांच्या समर्थनार्थ आनंद मठावर जाणार असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे आता एकनाथ शिंदे यांची महापालिकेतही मेजॉरिटी असल्याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत.

(हेही वाचाः शिंदेंचा शिवसेनेला जबरदस्त दणका, प्रभुंना हटवले गोगावले यांची प्रतोदपदी नियुक्ती)

50 नगरसेवकांचे समर्थन

एकनाथ शिंदे यांनी बंडाचे निशाण उभे केल्यानंतर शिवसेनेतील आमदारांचा एक गट त्यांच्या बाजूने आला. त्यामुळे शिवसेनेसाठी हा फार मोठा धक्का आहे. त्यानंतर आता ठाणे महापालिकेतील 50 नगरसेवकांनी देखील एकनाथ शिंदे यांच्या समर्थनार्थ उतरण्याचे ठरवले आहे. ठाण्यातील घोडबंदर, वागळे, कोपरी या भागातील शिवसैनिक एकत्र येऊन आनंद मठावर हिंदुत्वाचा जागर करणार आहेत.

ठाण्यातही शिवसेनेला धक्का?

ठाणे महापालिकेत सध्या शिवसेनेचे 67 नगरसेवक आहेत. त्यापैकी 50 नगरसेवकांचे एकनाथ शिंदे यांना समर्थन आहे. या नगरसेवकांनी पक्षातील इतर पदाधिका-यांना देखील आपल्या बाजूने करण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे आता ठाणे महापालिकेतही शिवसेनेला धक्का बसल्याचे बोलले जात आहे.

(हेही वाचाः एकनाथ शिंदेंनी करून दाखवले!)

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here