‘त्या’ वक्तव्यावर केसरकरांकडून शरद पवारांची जाहीर दिलगिरी, म्हणाले….

152

गेल्या काही दिवसांत माध्यमांशी बोलताना राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांच्याबद्दल शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांनी अनुद्गार काढल्याची चर्चा होती. शरद पवारांवर शिवसेना फोडल्याचा आरोप करणारे केसरकर यांनी पवारांविषयीच्या आपल्या वक्तव्यावर खुलासा केला आहे. यासंदर्भात शुक्रवारी माध्यमांशी बोलतना केसरकर म्हणाले, मी कधीही असा वागलो नाही, शरद पवारांचा माझ्या जडणघडणीत मोठा वाटा आहे, असे सांगत मी हे केले असेल तर शरद पवारांची जाहीर दिलगीरी व्यक्त करतो. शरद पवारांविषयी मी कधीही अपशब्द काढलेला नाही, असेही केसरकरांनी म्हटले आहे. मात्र आपल्या वक्तव्यावर खुलसा करताना त्यांनी जितेंद्र आव्हाडांना लक्ष्य केले आहे.

… तर त्याबद्दल मी जाहीर दिलगिरी व्यक्त करतो

केसरकर माध्यमांशी बोलताना म्हणाले, नुकत्याच झालेल्या राज्यातील राजकीय घडामोडींदरम्यान मी जेव्हा विविध मुलाखती दिल्या होत्या, त्यामध्ये शरद पवारांबद्दलचा उल्लेख होता. पण पवारांबद्दल मी कधीही अनुद्गार काढलेले नाहीत. माझ्या जडणघडणीत ज्यांचा मोठा वाटा आहे, त्यापैकी एक पवार आहेत. त्यामुळे त्यांच्याबद्दल एकही अपशब्द माझ्या तोंडून येऊ शकत नाही. शरद पवार हे महाराष्ट्राचे ज्येष्ठ नेते आहेत. प्रत्येकाला त्यांच्याबद्दल आदर आहे. जर त्यांच्याबद्दल माझ्या तोंडून चुकून एखादा शब्द निघाला असेल, तर त्याबद्दल मी जाहीर दिलगिरी व्यक्त करतो, असे देखील केसरकर म्हणाले.

(हेही वाचा – मुख्यमंत्री शिंदेंच्या विधानसभेतील भाषणाचं मोदींनी केलं कौतुक, म्हणाले…)

आव्हाडांचा दावा फेटाळला

केसरकरांनी जितेंद्र आव्हाडांचा दावा फेटाळला आहे. पुढे बोलताना केसरकर म्हणाले, आव्हाडांनी म्हटले की, ते शरद पवारांच्या वतीने मला भेटायला आले होते. आव्हाड हेलिकॉप्टरने माझ्याकडे आले होते, ही वस्तुस्थिती आहे. पण ते नारायण राणेंच्या मुलाचा प्रचार करा असे सांगायला आले होते. ते अजिबात शरद पवारांचा निरोप घेऊन आले नव्हते. शरद पवार माझ्या मतदारसंघात आले, तेव्हा मी त्यांना राजीनामा दिला. मी त्यांना नम्रपणे सांगितले की तुमच्यामुळे मी आमदार आहे. पण मी त्यांचा प्रचार करू शकत नाही. तुमच्याबरोबर स्टेजवर येऊ शकत नाही म्हणून मी आमदारकीचा राजीनामा देतो, असे पत्र मी त्यांना दिल्याचे केसरकरांनी सांगितलं.

मी राष्ट्रवादीमध्ये होतो, यावेळी त्यांनी अनेक गोष्टी मला सांगितले. त्यांचे वैशिष्ट्य म्हणजे महाराष्ट्रात जेव्हा शिवसेना फुटली तेव्हा त्यामागे शरद पवार होते. ही वस्तुस्थिती आहे. आपण प्रत्येक गोष्टीचे साक्षीदार आहोत. मी राष्ट्रवादीत असताना ते विश्वासात घेऊन सर्व सांगायचे. असे वक्तव्य केसरकरांनी केले होते. शरद पवारांनीच मला, जरी मी नारायण राणेंना बाहेर पडण्यासाठी मदत केली असली तरी कोणत्या पक्षात जावं याची अट ठेवलेली नाही. हा निश्चित त्यांच्या मनाचा मोठेपणा आहे. पण याचा अर्थ नारायण राणेंना शिवसेनेतून बाहेर पडण्यासाठी पवारांनीच मदत केली होती, असा दावा केसरकरांनी केला होता.

Join Our WhatsApp Community

Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.