शिवसेनेचे उपनेते आणि माजी स्थायी समिती अध्यक्ष तसे दक्षिण मुंबईचे विभागप्रमुख यशवंत जाधव यांचा सोमवारी २८ ऑगस्ट रोजी साठावा वाढदिवस असून यानिमित्त त्यांच्या विभागातील कार्यकर्त्यांनी षष्ठयब्दी सोहळा त्यांच्या मित्रपरिवाराने आयोजित करण्यात आला आहे.
या षष्ठ्यब्दी सोहळ्यात यशवंत जाधव यांची ६० किलो वजनाच्या ग्रंथाची तुला केली जाणार असून या तुलातील सव ग्रंथांचा वापर विभागातील सर्व ग्रंथालय तथा वाचनालयाला केले जाणार आहे. भायखळा विधानसभा क्षेत्रात आमदार यामिनी जाधव आणि माजी स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांच्या प्रयत्नाने फिरते वाचनालय सुरु केले जात असून त्यामध्येही हे ग्रंथ उपलब्ध करून दिले जाणार असल्याची माहिती आयोजकांनी दिले आहेत.
(हेही वाचा –Job Scam : नोकरीच्या आमिषाने तरुणाकडून लुटले साडे नऊ लाख रुपये)
मी यशवंत… षष्ठ्यब्दी एका वादळाची टॅगलाईने वाढदिवसा निमित्त आयोजित विशेष सोहळ्याचे लक्ष वेधून घेण्यात आले आहे. सोमवारी २८ ऑगस्ट २०२३ रोजी भायखळा पूर्व येथील ई. एस. पाटणवाला रोडवरील अण्णाभाऊ साठे नाट्यगृहात सायंकाळी साडेसहा वाजल्यापासून या सोहळ्याला सुरुवात होणार आहे. या प्रसंगी मान्यवरांची मनोगते मी यशवंत या त्यांच्या जीवन चरित्रावरील आधारीत चित्रफितीचे प्रकाशन करण्यात आले. त्यानंतर ग्रंथ तुला आणि त्यानंतर यशवंत जाधव हे कार्यकर्त्यांना भेटून त्यांच्या शुभेच्छांचा स्वीकार करणार आहेत.
या कार्यक्रमाला राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह मंत्री मंडळातील मंत्री तसेच पक्षाचे पदाधिकारी मोठ्या संख्येने हजेरी लावणार असल्याचे बोलले जात आहे. भायखळा विधानसभा क्षेत्रासह ते विभागप्रमुख असलेल्या दक्षिण मुंबईतील सहा विधानसभा क्षेत्रातील कार्यकर्ते व पदाधिकारी मोठ्याप्रमाणात उपस्थित राहणार असल्याचा विश्वास कार्यकर्त्यांना वाटत आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community