छत्रपती शिवाजी महाराज मैदानावर (शिवाजी पार्क) यंदाच्या दसरा मेळावा कोणत्या शिवसेनेचा होईल याबाबत तर्क वितर्क लढवले जात असतानाच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आपल्या पक्षाच्या दसरा मेळावा अन्य ठिकाणी होणार असल्याचे जाहीर केले. त्यामुळे मुख्यमंत्र्यांच्या सूचनेनुसार शिवसेनेचे आमदार सदा सरवणकर यांनी छत्रपती शिवाजी महाराज मैदानावर दसरा मेळावा आयोजित करण्यासाठी परवानगी मिळावी म्हणून केलेला अर्ज मागे घेतला असल्याची माहिती त्यांनी ट्विटरच्या माध्यमातून दिली आहे. विशेष म्हणजे ‘हिंदुस्थान पोस्ट’ ने ०२ ऑक्टोबर २०२३ रोजी’ शिवतीर्थावरील दसरा मेळाव्या बाबत शिवसेनेत संभामवस्था, म्हणून घेतली जाईल माघार’ अशा आशयाच्या वृत्त प्रकाशित करून शिवसेना या शिवतिर्थावरील दसरा मेळावाच्या आयोजनातून माघार घेणार असल्याचे भाकीत केले होते. (Shivsena Dasera Rally)
शिवसेनेचा परंपरेनुसार दसरा मेळावा शिवतीर्थावर होत असतो. त्यामुळे मागील वर्षीच्या अनुभव लक्षात घेता ठाकरे गटाच्या शिवसेनेच्या वतीने तसेच एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेच्या वतीने दोन स्वतंत्र अर्ज महापालिकेच्या विभागाकडे प्राप्त झाले होते. मात्र यापैकी कोणत्या गटाला परवानगी द्यावी हा मोठा तिढा हा महापालिकेसमोर उभा होता. मागे युवा विषयी महापालिकेने दोन्ही शिवसेनेचे अर्ज नाकारल्यानंतर ठाकरे गटाने कोर्टात धाव घेतली. त्यानंतर न्यायालयाने ठाकरे गटाला दसरा मेळाव्याचे आयोजन करण्यास परवानगी दिली होती. मात्र यावेळेस दोन्ही शिवसेनेकडून दसरा मेळावा आयोजनाच्या परवानगीकरता अर्ज प्राप्त झाले होते. (Shivsena Dasera Rally)
दरम्यान, शिवसेनेच्या वतीने आमदार सदा सरवणकर यांनी अर्ज केला होता. मंगळवारी त्यांनी ट्विटरच्या माध्यमातून आपण अर्ज मागे घेत असल्याची माहिती दिली. ते आपल्या ट्विटर मध्ये असे म्हणतात की, यावर्षी देखील शिवसेनेचा दसरा मेळावा त्याच उत्साहात व्हावा व हिंदूसणांमध्ये एकमेकांमधील वाद टाळावा म्हणून शिवसेना नेते, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांनी दसरा मेळावा अन्य ठिकाणी होणार असल्याचे जाहीर करून सामंजस्याची भूमिका घेतली. त्याबद्दल त्यांचे शिवसैनिक व हिंदुजनतेच्या वतीने जाहीर आभार! तसेच आपल्या सूचनेनुसार छत्रपती शिवाजी महाराज पार्क मैदान, दसरा मेळाव्यासाठीचा अर्ज मागे घेत आहोत! शिवसेनेने आपला अर्ज मागे घेतल्यामुळे शिवतीर्थावर ठाकरे गटाचा दसरा मेळावा होणार हे आता नक्की झाले आहे. (Shivsena Dasera Rally)
(हेही वाचा – Shiv Sena Dasara Melava 2023 : शिवतिर्थावरील दसरा मेळाव्याबाबत शिवसेनेतच संभ्रमावस्था, म्हणून घेतली जाईल माघार)
हिंदुस्थान पोस्टच्या वृत्तानुसार, परंपरेनुसार यंदाचा दसरा मेळावा शिवतिर्थ अर्थात छत्रपती शिवाजी महाराज मैदानात आयोजित करण्यासाठी दोन्ही शिवसेनेच्यावतीने महापालिकेच्या जी-उत्तर विभागात परवानगीसाठी अर्ज सादर केला. मात्र, या मैदानावर दसरा मेळावा घेण्याची परवानगी कोणत्या शिवसेनेच्या गटाला मिळणार याबाबत स्पष्टता नसून यावर न्यायालयातून परवानगीचा मार्ग सोडवला जाण्याची शक्यता वर्तवला जात आहे. शिवतिर्थावर मेळावा घेण्याबाबत एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेमध्येच संभ्रमावस्था निर्माण झाली आहे. त्यामुळे शिवतिर्थावरील मेळाव्याचा हट्ट न धरता मागील वर्षी प्रमाणे बीकेसीच्या मैदानातच मेळावा आयोजित करण्याची मागणी एका गटाकडून केली जात आहे. त्यामुळे शिवतिर्थाची मागणी करत एकप्रकारे ठाकरेंना मोठे बळ देण्याऐवजी त्या जागेचा हट्ट सोडून शिवसेनेचे मुख्य नेते तथा मुख्यमंत्री हे बीकेसीतील मैदानाला प्राधान्य देण्याची शक्यता अधिक असल्याचे बोलले जात आहे. ठाकरे गटाच्या शिवसेनेला या दसरा मेळाव्याच्या आयोजनापासून वंचित ठेवून त्याचे अधिक महत्त्व वाढव देऊ नये, अशा प्रकारचे मत त्यांचे मित्र पक्ष असलेल्या भाजप सह पक्षातील सहकाऱ्यांचेही होते. त्यामुळे शिवसेनेचा दसरा मेळावा शिवतीर्थावर घेण्याबाबत संभ्रमावस्था होती. आडवणुकीची भूमिका घेऊन शेवटच्या क्षणाला जर न्यायालयाने ठाकरे गटाच्या शिवसेनेला मेळाव्याच्या आयोजन करण्यास परवानगी दिली, तर त्या शिवसेनेचे महत्त्व अधिक वाढते आणि शिवसैनिक मोठ्या त्वेषाने शिवतीर्थावर जमा होतो. त्यामुळे ठाकरे गटाच्या शिवसेनेला अधिक महत्त्व न देता या मेळाव्याचे आयोजन शिवतीर्थ ऐवजी अन्य ठिकाणी करावं असे एक मत पक्षात निर्माण झालं होतं. त्यानुसार मुख्यमंत्र्यांनी हा निर्णय घेतला असावा असे बोलले जात आहे. (Shivsena Dasera Rally)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community