चिथावणीखोर भाषणाबाबत आमदार प्रकाश सुर्वे यांच्या विरोधात शिवसेनेची पोलिसांत तक्रार

95

मागाठाणेचे स्थानिक आमदार प्रकाश सुर्वे यांनी शिवसेना सोडून शिंदे गटात सामील झाल्यानंतर आता सुर्वेंना कोडीत पडकण्यास सुरुवात केली जात आहे. सुर्वे यांनी केलेल्या प्रक्षोभक व चिथावणीखोर भाषणाबाबत शिवसेनेच्या दहिसरमधील पदाधिकाऱ्यांनी दहिसर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आणि त्यांच्याविरोधात गुन्हे दाखल करून त्यांच्यावर कडक कारवाई करावी अशी मागणी केली आहे.

(हेही वाचा – Azadi ka Amrit Mahotsav: स्वातंत्र्यदिन आणि प्रजासत्ताक दिनाला वेगळ्या पद्धतीने फडकावला जातो ध्वज! काय आहे फरक?)

शिवसेनेचे दहिसर विधानसभेचे प्रमुख व माजी नगरसेवक उदेश पाटेकर यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना पदाधिकारी व माजी नगरसेवकांच्या शिष्टमंडळाने दहिसर पोलिस ठाण्याला निवेदन देत मागाठाणेचे आमदार प्रकाश सुर्वे यांच्या चिथावणीखोर भाषणाबाबत कडक कारवाई करण्याची मागणी केली आहे. शिवसेनेच्यावतीने पोलिस ठाण्यात दिलेल्या या निवेदनामध्ये मागाठाणे आमदार प्रकाश सुर्वे यानी रविवारी १४ ऑगस्ट २०२२ रोजी सकाळी ११.०० वाजता दहिसर कोकणीपाडा बुद्धविहार येथे झालेल्या कार्यक्रमात उपस्थित कार्यकर्त्याना संबोधून चिथावणीखोर व प्रक्षोभक भाषण केले असल्याचे सांगितले. ते फेसबूक लाईव्ह शशांक पांडे यांच्या अकाऊंटला आहे.

निवेदनात काय म्हटले?

या भाषणात …….. ठोकून काढा, कापून काढा, हात नाही तोडता आला तर तंगडी तोडा…, दुसऱ्या दिवशी मी टेबल जमीन करून देतो. कोथळा फाडल्याशिवाय सोडणार नाही.. अशी चिथावणीखोर वाक्याचा समावेश आहे. यांचे व्हिडिओ रेकॉर्डिंगही असल्याचे त्यांनी निविदनात म्हटले आहे. आज लोकशाही प्रधान देशाच्या स्वातंत्र्यदिनाचा अमृत महोत्सव साजरा करत असताना जर देशाच्या संविधानाचे लोकशाहीचे विश्वस्त समजले जाणारे आमदारच जर अशी प्रक्षोभक भाषणे करुन तरुण कार्यकर्त्याना तुम्ही गुन्हेगारी करा, मी तुम्हाला सोडून आणेन असे बोलून लोकशाहीची थट्टा करणार असतील, प्रभागात जीवे मारण्याच्या जाहीर धमक्या लोकांना देणार असतील तर हे अतिशय लज्जास्पद व संताप जनक असल्याचेही म्हटले आहे.

गुन्हे दाखल करून कारवाई करण्याची मागणी

आशा पद्धतीने कायदा, सुव्यवस्था, लोकशाही संविधान यांचे धिंडवडे काढणाऱ्या या आमदार प्रकाश सुर्वे यांच्यावर इतर कलमाखाली गुन्हे दाखल करावेत व कडक कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी या निवेदनाद्वारे काढली आहे. या शिष्टमंडळामध्ये शिवसेना प्रवक्त्या संजना घाडी, माजी नगरसेविका सुजाता पाटेकर, बाळकृष्ण ब्रीद, गीता सिंघण, विधानसभा संघटक भास्कर खुरसुंगे, विधानसभा संघटक अशोक महामुनकर, सिनेट सदस्य शशिकांत झोरे आदी उपस्थित होते. यासर्व पदाधिकाऱ्यांनी पोलिस ठाण्यावर दिलेल्या निवेदनावर स्वाक्षरी केल्या आहेत.

Join Our WhatsApp Community

Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.