राजकीय सभांना आता टीझरचे वेड! बुस्टर नाही तर मास्टर, शिवसेनेच्या सभेआधी भाजपवर वार   

122

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या सभेच्या आधी टीझर लॉन्च करण्याची पद्धत सुरु झाली आहे. त्यामुळे सभेला आपसूकच गर्दी जमत असते. हा ट्रेंड आता भाजप आणि शिवसेनेनेही स्वीकारला आहे. भाजपने नुकतीच सायन येथे सभा घेतली होती, त्याला बुस्टर सभा म्हणून घोषित केली होती, त्याचा टीझर लॉन्च करण्यात आला होता, आता शिवसेनेची १४ मे रोजी सभा होत आहे. त्यासाठी बुस्टर नाही मास्टर असा टीझर तयार करण्यात आला आहे.

शिवसेनेतर्फे येत्या १४ मे रोजी वांद्रे-कुर्ला संकुलात विराट सभेचे आयोजन करण्यात आले आहे. पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे या विराट सभेला संबोधित करणार असून या सभेचा एक ‘टीझर’ शिवसैनिकांनी व्हायरल केला आहे. उद्धव ठाकरे यांच्या निशाण्यावर कोण असणार याची झलक या टीझरमधून पाहिला मिळत आहे. भोंग्यांच्या मुद्द्यावर मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि पालिकेच्या भ्रष्टाचाराच्या मुद्दयावर विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांना मुद्देसुद उत्तर देण्याची तयारी उद्धव ठाकरे यांनी केल्याचे या टीझरमध्ये पाहिला मिळत आहे.

(हेही वाचा आता गुगल ट्रान्सलेटरवर संस्कृत, कोकणी आणि भोजपुरी भाषेचाही समावेश)

काय म्हटलेय शिवसेनेच्या टीझरमध्ये?

हो आम्ही मराठीच, आम्हीच महाराष्ट्रीय, आम्हीच मुंबईकर… आणि कायम गर्वाने हिंदू. हे सर्व आम्हाला भोंगे लावून, भगव्या शाली पांघरुन मोठ्या आवाजात रेकून सांगावं लागत नाही. डोस घ्यायचा सोस असेल तर ठोस सांगतो, नकली हिंदुत्ववाद्यांना आरसा आणि हिंदुहृदयसम्राटांचा वारसा दाखवायला येत आहोत, महामेळावा मुंबई… बुस्टर नाही मास्टर.. १४ मे बीकेसी.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.