मुख्यमंत्री उद्धव ठाकरे दीर्घकाळ आजारी राहिल्यानंतर रश्मी ठाकरे यांच्याकडे मुख्यमंत्री पद देण्यावरून चर्चा सुरू झाली असली, तरी ही चर्चा मुख्यमंत्री ठणठणीत असल्यापासूनच सुरू आहे. ‘हिंदुस्थान पोस्ट’च्या वतीने 17 जुलै रोजी ‘ऑफबीट नीलम ताई… मुलाखत… थोडी हटके’या मुलाखतीत बोलताना परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी ‘शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री म्हणून लॉंग टर्म १५-२० वर्षे काम करायला मिळावे, अशी आपली अपेक्षा आहे. पुढे राष्ट्रीय नेते म्हणून त्यांना मोठी संधी मिळाल्यावर, जर रश्मी वहिनींना मुख्यमंत्री व्हायचे असेल, तर आमचा त्यांना पाठिंबा असेल’, अशी भावना व्यक्त केली होती.
चंद्रकांत पाटलांनी मांडलेला विचार
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सध्या आजारी आहेत. त्यामुळे ते विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनालाही उपस्थित राहू शकले नव्हते. यावरून विरोध पक्षाने सत्ताधारी महाविकास आघाडी आणि शिवसेनेवर जोरदार टीका केली होती. उद्धव ठाकरे यांचा अन्य नेत्यांवर विश्वास नसेल, तर मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी रश्मी वहिनींकडे यांना द्यावी, असे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील म्हणाले होते. याचाच धागा पकडत आता शिवसेनेच्या एका नेत्याने, रश्मी ठाकरे मुख्यमंत्रिपद चांगल्या पद्धतीने सांभाळू शकतील, असे म्हटले आहे.
(हेही वाचा राजकीय नेत्यांमध्ये पसरतोय होलसेलमध्ये कोरोना! आता मंत्री एकनाथ शिंदे बाधित)
अब्दुल सत्तारांचा प्रस्ताव
रश्मी ठाकरे मुख्यमंत्रीपद चांगल्या प्रकारे सांभाळू शकतात. त्यांच्याकडे राज्याचे प्रमुखपद दिले तर कोणाचीही हरकत नसेल, असे शिवसेना नेते अब्दुल सत्तार यांनी म्हटले आहे. अब्दुल सत्तार हे दिल्ली गेले होते, तेथे त्यांनी महत्त्वाच्या मंत्र्यांच्या भेटीही घेतल्या, असे सत्तार म्हणाल्या.
नीलम गो-हे यांची ‘मन कि बात’
हिंदुस्थान पोस्टच्या वतीने 17 जुलै रोजी ‘ऑफबीट नीलम ताई… मुलाखत… थोडी हटके’ या मुलाखतीचे आयोजन करण्यात आले होते. विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी या मुलाखतीत आपली दिलखुलास मते मांडली. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री म्हणून लॉंग टर्म १५-२० वर्षे काम करायला मिळावे, अशी आपली अपेक्षा आहे. पुढे राष्ट्रीय नेते म्हणून त्यांना मोठी संधी मिळाल्यावर, जर रश्मी वहिनींना मुख्यमंत्री व्हायचे असेल, तर आमचा त्यांना पाठिंबा असेल, अशा भावना विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी व्यक्त केली होती.
Join Our WhatsApp Community