अनिल परबांच्या भोवती आवळला आयकर विभागाचा फास! कुठली आणि किती मालमत्ता लागली हाताला?

138

परिवहन मंत्री आणि शिवसेना नेते अनिल परब यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. आयकर विभागानं परब यांच्याशी संबंधित २६ ठिकाणी आयकर विभागानं धाडी टाकल्या आहेत. मुंबई, पुणे, सांगली, रत्नागिरीत आयकर विभागानं छापे टाकले आहेत. दापोली येथील जमीन व्यवहार प्रकरणात आयकर विभागाकडून कारवाई सुरू आहे.अनिल परब यांचे निकटवर्तीय मानले जाणारे सदानंद कदम आयकर विभागाच्या रडारवर आहेत.

cover letter

रिसॉर्ट बनवण्यासाठी 6 कोटी कॅशमध्ये खर्च

या कारवाईत केबल अॉपरेटर, सरकारी अधिकारी आणि काही व्यावसायिकांचाही समावेश आहे. दापोलीतील एक जागा परब यांनी 2017 मध्ये खरेदी केली होती. त्या जागेशी संबंधित काही कागदपत्रे आयकर विभागाच्या हाती लागले होते. 2017 ला ही जागा 1 कोटी रुपयांना खरेदी केली होती, ज्याची नोंदणी 2019 ला झाली. ही जागा परब यांनी 2020 मध्ये एका व्यक्तीला दिली होती. 1 कोटी 10 लाख रुपयांना दिली. याच जागेवर 2017 ते 2020 दरम्यान एक रिसॉर्ट बनवण्यात आला. हे रिसॉर्ट बनवण्यासाठी 6 कोटी कॅशमध्ये खर्च करण्यात आले.

(हेही वाचा यंदाही धुळवडीला मिळणार नाही जादा पाणी!)

100 एकर जमीन मागच्या 7 वर्षात खरेदी केली

बजरंग खरमाटे यांच्या मालमत्तेचीही माहिती आयकर विभागाने मिळवली. खरमाटे यांनी पुणे, सांगली, बारामती आणि एका ठिकाणी 100 एकर जमीन मागच्या 7 वर्षात खरेदी केली. काही शॉप्स आणि आलिशान बंगल्याची माहितीही आयकर विभागाने मिळवली आहे. बनावट कंत्राटांच्या माध्यमातून 27 करोड रुपये मिळवल्याची देयके आयकर विभागाला मिळाली. बारामती परिसरातील जमिनीची 2 करोड रुपयांची रिसिप्ट आयटीने मिळवली. छाप्यात 66 लाखांची रोख रक्कम आयकर विभागाने जप्त केली आहे. डिजिटल पुरावे आणि कागदपत्र आयकर विभागाने मिळवली आहेत.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.