‘गद्दारांच्या गाड्या फोडा, उद्धव ठाकरे सन्मान करतील’, शिवसेना नेत्याचे वादग्रस्त विधान

104

शिंदे गटातील आमदार, खासदारांचा उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेकडून गद्दार असा उल्लेख करण्यात येत आहे. आपण निष्ठावंत शिवसैनिक असल्याचे सांगत उद्धव ठाकरेंची साथ सोडणार नाही, असेही त्यांच्याकडून सांगण्यात येत आहे. त्यातच आता हिंगोलीतील शिवसेना नेते व संपर्कप्रमुख बबनराव थोरात यांनी एक वादग्रस्त विधान केलं आहे.

गद्दार आमदार, खासदारांच्या गाड्या जे कोणी फोडतील त्यांचा मातोश्रीवर सन्मान करण्यात येईल, असे वादग्रस्त विधान थोरात यांनी केले आहे. हिंगोली शहरातील शिवसेना कार्यकर्ता पदाधिकारी मेळाव्यात थोरात यांनी हे वक्तव्य केले आहे. हिंगोली जिल्ह्यातील शिवसेना जिल्हाप्रमुख संतोष बांगर हे शिंदे गटात सहभागी झाल्यामुळे नव्या जिल्हाप्रमुख पदासाठी अनेक जण उत्सुक आहेत. या उत्सुकांना थोरात यांनी अनोखे आवाहन केले आहे.

(हेही वाचाः जेव्हा कोश्यारींनी मुख्यमंत्र्यांकडे केली होती डीएनए टेस्टची मागणी)

काय म्हणाले थोरात?

‘ज्यांच्यामुळे तुम्ही आमदार, खासदार झालात त्यांच्याच पाठीत खंजीर खुपसण्याचं काम त्यांनी केलं आहे. त्यामुळे त्यांना आता आम्ही गावात येऊ देणार नाही. त्यामुळे जे कोणी जिल्हाप्रमुख पदासाठी उत्सुक आहेत त्या सगळ्यांना माझं आवाहन आहे ज्यांच्या कार्यक्षेत्रात गद्दार खासदार, आमदारांच्या गाड्या येतील त्यातली पहिली गाडी जो फोडेल त्याचा बहुमान उद्धव ठाकरे यांच्या हस्ते मातोश्रीवर करण्यात येईल. आता आपल्याला कामाला लागून या लबाडांना आणि भामट्यांना ठेचायचं आहे’, असे विधान बबनराव थोरात यांनी केले आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.