एकनाथ शिंदे-भाजप सरकारने आपले बहुमत सिद्ध केल्यानंतर आता या नव्या सरकारचं कौतुक करण्यात येत आहे. भाजपवर सातत्याने टीका करणा-या शिवसेना नेत्या दीपाली सय्यद यांनी आता याबाबत प्रतिक्रिया दिली आहे. भाजप आमची शत्रू नाही, पण वाचाळवीरांना माफी मिळणार नाही, असे ट्वीट करत दीपाली सय्यद यांनी भाजपला इशारा दिला आहे.
शिवसेना अजून जिवंत आहे
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि भाजपच्या सरकारवर शिक्कामोर्तब झाल्यानंतर शिवसेना नेत्या दीपाली सय्यद यांनी ट्वीट केले आहे. एकनाथ शिंदे माझ्यासाठी कालही आदरणीय होते, आजही आहेत आणि उद्याही राहतील. पण शिवसेनेच्या आमदारांना ढाल समजून किरीट सोमय्या आणि भाजपचे इतर दोन वाचाळवीर उद्धव ठाकरे आणि शिवसेनेवर टीका करत आहेत. पण आजही आमच्यातील शिवसेना आजही जिवंत आहे, उगाच आमची कळ काढू नका, अशा शब्दांत सय्यद यांनी भाजपला इशारा दिला आहे.
https://twitter.com/deepalisayed/status/1544591002765492225?s=20&t=5jYiTCBhXmm1Mdqm-nJ3IA
(हेही वाचाः ‘त्यांनी कोणाची सुपारी घेतली होती माहीत नाही?’, शिंदे गटातील आमदाराची राऊतांवर सडकून टीका)
भाजपने दखल घ्यावी
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भाजपवर दाखवलेल्या विश्वासाला तडा देऊ नका. भाजप आमची शत्रू नाही आणि त्यांच्याविरुद्ध आम्हाला बोलण्यास आनंदही नाही. पण वाचाळवीरांना माफी मिळणार नाही. भाजपने याची दखल घेणं गरजेचं असल्याचे दिपाली सय्यद यांनी ट्वीट करत म्हटले आहे.
Join Our WhatsApp Community