राऊतांच्या ‘त्या’ आरोपाला एकनाथ शिंदेंचे प्रत्युत्तर

सूरतमधील हॉटेलमध्ये ठेवण्यात आलेल्या शिवसेनेच्या बंडखोर आमदारांपैकी काही आमदारांना मारहाण करण्यात आल्याचा आरोप शिवसेना नेते संजय राऊत यांनी केला होता. राऊतांकडून कऱण्यात आलेले हे सर्व आरोप खोडून काढत शिवसेनेचे वरिष्ठ नेते एकनाथ शिंदे यांनी राऊतांना थेट उत्तर दिले आहे. यावेळी ते म्हणाले, संजय राऊतसाहेब हे आमचे नेते आहेत. परंतु आमदारांना मारहाण झाल्याचा कोणताही प्रकार घडलेला नाही किंवा त्यांचे अपहरण केले नाही.

(हेही वाचा – राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना कोरोनाची लागण)

काय दिले एकनाथ शिंदेंनी प्रत्युत्तर

राऊतांनी केलेल्या आरोपांवर एकनाथ शिंदेंनी प्रत्युत्तर देतांना म्हटले की, आमच्याकडून आमदारांवर कोणतीही जोरजबरदस्ती करण्यात आलेली नाही. आम्ही सर्व बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचे असल्याने एकत्र आलो आहोत, असे स्पष्ट केले. आमदारांचे अपहरण करून त्यांना गुजरात नेण्यात आलेल्या आरोपावर ते असेही म्हणाले की, लोकशाहीमध्ये असा प्रकार होऊ शकत नाही. आम्ही कोणालाही बळजबरी केलेली नाही. तो एक रणनितीचा भाग आहे. आम्ही कोणावरही दबाव टाकला नाही. आम्ही जर त्यांना दबाव टाकून गुजरात नेले असते, मग ते आसामला कसे काय आले, असा सवालही एकनाथ शिंदे यांनी उपस्थित केला आहे.

हिंदुत्वाशी कोणतीही फारकत घेणार नाही

पुढे बोलताना शिंदे म्हणाले, आम्ही दुसऱ्या पक्षासोबत जाण्याचा कोणताही अद्याप विचार केलेला नाही. मी बाळासाहेबांचा कट्टर शिवसैनिक आहे. विकासाचे राजकारण आणि बाळासाहेबांचे विचार मला पुढे घेऊन जायचे आहे. त्यामुळे हिंदुत्वाशी कोणतीही फारकत घेणार नाही. कोणावरही टीका करून मला माझा वेळ वाया घालवायचा नाही, असे म्हणत त्यांनी टीकाकारांना खोटक टोला लगावला आहे

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here