शिवसेनेला आणखी एक धक्का! ज्येष्ठ नेते रामदास कदम यांनी दिला नेतेपदाचा राजीनामा

176

शिवसेनेतून उठाव करत एकनाथ शिंदे यांनी 50 आमदारांसह आपला एक वेगळा गट स्थापन केला. या गटाच्या बळावर शिंदे यांनी राज्याच्या मुख्यमंत्रीपदाची शपथही घेतली. त्यानंतर शिंदे गटाचे संख्याबळ हे दिवसेंदिवस वाढत चालले आहे. आमदारांनंतर शिवसेनेचे पदाधिकारी,नगरसेवक आणि कार्यकर्ते शिंदे गटात सहभागी होत असताना आता शिवसेनेला आणखी एक मोठा धक्का बसला आहे. शिवसेनेचे ज्येष्ठ नेते रामदास कदम यांनी देखील आपल्या नेतेपदाचा राजीनामा दिला आहे. त्यामुळे उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला आता चांगलीच गळती लागलेली आहे.

रामदास कदम यांचा राजीनामा

राज्यात महाविकास आघाडीचं सरकार आल्यानंतर बाळासाहेब ठाकरे यांचे खंदे शिवसैनिक असलेले रामदास कदम हे शिवसेनेवर नाराज होते. अनेकदा त्यांनी आपली नाराजी उघडपणे बोलून देखील दाखवली होती. रामदास कदम यांचा विधान परिषद सदस्यत्वाचा कार्यकाळ संपल्यानंतरही त्यांना पुन्हा संधी देण्यात आली नव्हती. त्यामुळे रामदास कदम यांच्या राजीनाम्याची चर्चा सुरू असतानाच अखेर सोमवारी त्यांनी आपल्या नेतेपदाचा राजीनामा दिला आहे.

रामदास कदम यांचे पुत्र योगेश कदम यांनी देखील नुकताच शिंदे गटात प्रवेश केला आहे. त्यांच्यासोबत गुहागर-दापोली भागातील अनेक नगरसेवकांनी देखील उद्धव ठाकरेंची साथ सोडत एकनाथ शिंदे यांच्या गटात प्रवेश केला होता.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.