भाजपा नेत्यांच्या रोमारोमांत ‘मराठीद्वेष’! राऊतांचा रोखठोक वार

भाजपचे लोक एक दिवस मराठी माणसालाच मुंबईतला परप्रांतीय ठरवतील! त्यांचे वागणे, बोलणे व डोलणे तसेच दिसत आहे.

भाजपाचे लोक एक दिवस मराठी माणसालाच मुंबईतला परप्रांतीय ठरवतील! त्यांचे वागणे, बोलणे व डोलणे तसेच दिसत आहे, त्यांच्या रोमारोमांत मराठीद्वेष भरला आहे, अशी टीका शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केली आहे. ठाण्यातील सहायक आयुक्तांवरील हल्ला आणि साकीनाका बलात्काराच्या निमित्ताने संजय राऊत यांनी परप्रांतीयांसंबंधी सामनातील रोखठोकमधून आपली भूमिका मांडली आहे.

(हेही वाचाः मुंबईसह मोठ्या शहरांचे परप्रांतीयांमुळेच विकृत गुन्हेगारीकरण!)

राऊतांचे रोखठोक

महाराष्ट्रात अधूनमधून परप्रांतीयांच्या विषयाला उकळी फुटत असते, तशी ती आता फुटलेली दिसत आहे. मुंबईच्या साकीनाका परिसरात एका महिलेवर बलात्कार करुन हत्या करण्यात आली. या घटनेचे राजकीय पडसाद देशभरात उमटले. बलात्कार करणारा आरोपी मोहन चौहाण हा उत्तर प्रदेशातून येथे आलेला आहे. ठाण्यात पालिका सहायक आयुक्त कल्पिता पिंपळे यांच्यावर हल्ला करणारा अनधिकृत फेरीवालाही बाहेरचाच होता, त्यामुळे वादंग माजले. महाराष्ट्रात जगभरातून जे लोंढे वाहत येतात त्याची नोंद कोठेच नाही. ते कोठेही राहतात, काहीही करतात. हे सर्व परप्रांतीय लोक कोठून येतात, काय करतात, त्यांचा आगापिछा काय याची नोंद ठेवणे गरजेचे आहे. पोलिसांनी ते काम करावे, अशी भूमिका मुख्यमंत्री ठाकरे यांनी मांडली. 

(हेही वाचाः परप्रांतीयांच्या नोंदी ठेवा! मुख्यमंत्र्यांचा आदेश

मुख्यमंत्र्यांच्या भूमिकेवर भाजपाचे आंदोलन

मुख्यमंत्र्यांच्या या भूमिकेवर भारतीय जनता पक्षाने मुंबईत आंदोलन केले. खरे तर महाराष्ट्रात राजकारण करणा-या प्रत्येक राजकीय पक्षाने, सामाजिक संस्थेने मुख्यमंत्र्यांच्या या भूमिकेचे स्वागतच करायला हवे. मुंबईसारख्या शहरातील वातावरण शुद्ध राहावे, सुरक्षित राहावे यासाठी हे आवश्यक ठरते. राज्याच्या कायदा आणि सुव्यवस्थेशी निगडित अशी ही भूमिका आहे, पण भारतीय जनता पक्षाने यावर आंदोलन सुरू केले, अशी टीका संजय राऊतांनी केली आहे.

(हेही वाचाः परप्रांतीयांची नोंद : भाजपाची मुख्यमंत्र्यांच्याविरोधात पोलिस ठाण्यात तक्रार!)

भाजपाचे फूट पाडण्याचे राजकारण

नक्की परप्रांतीय कोण? हा प्रश्न यानिमित्ताने पुन्हा एकदा चर्चेत आला. मुख्यमंत्री ठाकरे यांनी परप्रांतीय म्हणून कोणत्याही राज्याचे किंवा भाषिकांचे नाव घेतले नाही, पण भारतीय जनता पक्षाने हे परप्रांतीय म्हणजे उत्तर भारतीय असे परस्पर जाहीर केले. हे समाजात फूट पाडण्याचे राजकारण आहे. असे करणाऱ्यांबद्दल गुन्हेच दाखल केले पाहिजेत, असे देखील संजय राऊत म्हणाले.

(हेही वाचाः सेनेच्या मुंबई महापालिकेत परप्रांतीय कंत्राटदाराला झुकते माप, मराठी कंत्राटदार प्रतीक्षेत!)

मराठी माणसालाच परप्रांतीय ठरवतील

उत्तर प्रदेश विधानसभेच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन परप्रांतीयांचा मुद्दा उकरुन काढणे हा दळभद्री प्रकार आहे. आपल्या राज्यात कोणी बाहेरचे येऊन घाण करीत असतील तर घाण करणा-यांच्या मुसक्या आवळणे हे राज्य सरकारचे काम आहे. भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष, माजी मंत्री चंद्रकांत पाटील यांनी एक साळसूद प्रश्न विचारला आहे- ‘परप्रांतीयांना का दोष देता? मराठी लोक गुन्हे करीत नाहीत काय?’’ मराठीद्वेष भाजपातील मराठी नेत्यांच्या रोमारोमांत कसा भिनला आहे ते या एका वाक्यात दिसते!, अशा शब्दांत संजय राऊतांनी संताप व्यक्त केला आहे. भाजपचे लोक एक दिवस मराठी माणसालाच मुंबईतला परप्रांतीय ठरवतील! त्यांचे वागणे, बोलणे व डोलणे तसेच दिसत आहे, अशी टीका संजय राऊतांनी केली आहे.

(हेही वाचाः परप्रांतीय नोकरांपासून सावधान! विश्वास संपादन करून करीत आहेत चोऱ्या!)

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here