मुंबईतील वांद्रे येथील उद्धव ठाकरे यांच्या निवासस्थानी मातोश्रीवर (Matoshree) शिवसेना (Shiv Sena, उबाठा) कार्यकर्त्यांनी संजय राऊत (Sanjay Raut) यांना मारहाण केल्याचे वृत्त समाजमाध्यमांवर मोठया प्रमाणात व्हायरल होत आहे. ‘एनएमएफ’ (NMF) या हिंदी वृत्तवाहिनीवर हे वृत्त प्रसारित करण्यात आले आहे. या वृत्तवाहिनीची लिंक ‘X’ या हँडल वर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. मात्र या मारहाणीला कुठलाही अधिकृत दुजोरा देण्यात आलेला नाही. तसेच शिवसेनेच्या कोणत्याही पदाधिकाऱ्याने या वृत्ताविषयी अद्याप खुलासा केलेला नाही.
(हेही वाचा – Welcome 2025 : ख्रिस्ती नववर्षाच्या प्रथम दिनी तीर्थक्षेत्रे भाविकांनी फुलली)
एनएमएफ या वृत्तवाहिनीने दिलेल्या वृत्तानुसार, सेना उबाठाचे नेते राऊत यांच्यावर केवळ हल्लाच झाला नाही, तर पक्षाच्या संतप्त कार्यकर्त्यांनी त्यांना एका खोलीत बंद केले. नुकत्याच झालेल्या पक्षाच्या बैठकीत उद्धव ठाकरे यांच्यासमोरच हाणामारी झाल्याचा आरोपही केला जात आहे. येत्या काही महिन्यांत महानगरपालिकेच्या निवडणुका होण्याची शक्यता असलेल्या मुंबईतील त्यांच्या पक्षाच्या स्थितीचे मूल्यांकन करण्यासाठी सेनेच्या उबाठा प्रमुखांनी नुकत्याच घेतलेल्या बैठकीत हे संपूर्ण नाट्य घडले, असा दावा वृत्तवाहिनेने केला आहे.
एनएमएफने दिलेल्या वृत्तानुसार, राऊत यांची पक्षाच्या कार्यकर्त्यांशी जोरदार शाब्दिक भांडणे झाली. बैठकीदरम्यान काही उबाठा कार्यकर्त्यांनी आरोप केला की, राऊत यांच्या वक्तव्यामुळे आणि त्यांच्या भूमिकेमुळे पक्षाचे अलीकडच्या काळात खूप नुकसान झाले आहे. या आरोपांमुळे सेनेचे उबाठा खासदार संतप्त झाले आणि त्यांनी जोरदार बाचाबाची केली. या शाब्दिक चकमकीचे रूपांतर हाणामारीत झाले, संतप्त झालेल्या सेनेच्या उबाठा कार्यकर्त्यांनी राऊत यांच्यावर आरोप करून त्यांना मारहाण केली. त्यांना अनेक तास एका खोलीत कोंडून ठेवण्यात आले होते. संजय राऊत यांना त्यांच्याच पक्षाच्या कार्यकर्त्यांनी बेदम मारहाण केली आणि नंतर त्यांना एका खोलीत कैद केले, असा दावा करणाऱ्या असंख्य बातम्यां सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
#WATCH | Mumbai: On local body elections, Shiv Sena (UBT) spokesperson Anand Dubey says, “…The suggestion, advice that is coming from Shiv Sainiks across Maharashtra to the party high command is that we should contest the elections alone. By contesting alone, we get the benefit… pic.twitter.com/9eQUoTF5Sx
— ANI (@ANI) December 30, 2024
मात्र, संजय राऊत, उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) किंवा पक्षातील इतर कोणत्याही ज्येष्ठ नेत्याने या वृत्तांवर भाष्य केलेले नाही. दरम्यान, शिवसेना उबाठा गटाचे प्रवक्ते आनंद दुबे (Anand Dubey) यांनी अलीकडेच मुंबईतील आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका काँग्रेस आणि शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेससोबत युती न करता स्वतंत्रपणे लढण्याची शक्यता असल्याचे संकेत दिले.
३० डिसेंबर रोजी एएनआयशी बोलताना दुबे यांनी खुलासा केला की, संपूर्ण महाराष्ट्रातील शिवसैनिक पक्ष नेतृत्वाला निवडणुकीत एकट्याने उतरण्याचा आग्रह करत आहेत. “एकट्याने लढल्याने आमच्या कार्यकर्त्यांचा उत्साह वाढतो आणि अधिक उमेदवारांना निवडणूक प्रक्रियेत सहभागी होता येते.” दुबे यांनी स्वतंत्र लढतीसाठी तळागाळातील वाढत्या मागणीवर प्रकाश टाकला, तर त्यांनी स्पष्ट केले की, अंतिम निर्णय पक्षाच्या प्रमुख नेत्यांवर अवलंबून आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community