तब्ब्ल शंभरहून अधिक दिवसांनंतर शिवसेना नेते संजय राऊत तुरूंगातून बाहेर आले आहेत. बाहेर येताच त्यांनी पहिल्यांनी आज, गुरूवारी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी देवेंद्र फडणवीसांचे कौतुक केल्याचे पाहायला मिळाले. तुरूंगातील यातना कोणाच्या वाट्याला येऊ नये, तुरूंगात राहणं फार कठिण असते, असे सांगतानाच लवकरच पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार असल्याचे राऊतांनी सांगितले. इतकेच नाही तर आज, गुरूवारी संजय राऊत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी कॉग्रेसचे अध्यक्ष शरद पवार या दोघांची भेट घेणार आहेत.
(हेही वाचा – ‘… सत्ता गेल्याने पुरोगाम्यांची फालतूगिरी!’, शरद पोंक्षेंचा राष्ट्रवादीवर घणाघात )
… म्हणून घेणार भेट
तुरूंगातून जामिनावर सुटका झाल्यानंतर संजय राऊतांच्या गाठीभेटी वाढल्या आहेत. आज संजय राऊत मातोश्रीवर आणि सिल्व्हर ओक येथे जाणार आहेत. राऊत या दोन्ही नेत्यांची भेट घेणार इअसून यावेळी त्यांच्यात कोणती महत्वाची चर्चा होतेय का याकडे साऱ्यांचे लक्ष लागून राहिले आहे. दरम्यान, पंतप्रधान मोदी, शहा आणि फडणवीस यांची भेट घेण्यामागचे कारण सांगताना ते म्हणाले, माझ्यावर काय अन्याय झाला याची तक्रारच यांच्याकडे करणार आहे.
राऊतांनी केले फडणवीसांचे कौतुक
तुरूंगात असताना मी पेपर वाचायचो, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मागच्या काळामध्ये काही चांगले निर्णय घेतले आहेत. विशेषतः गरिबांना घर देण्यासंदर्भात आणि म्हाडाला अधिकार देण्यासंदर्भात फडणवीस यांनी घेतलेले निर्णय कौतुकास्पद आहेत, असे म्हणत सध्या राज्याचा कारभार उपमुख्यमंत्रीच चालवतात, हे माझं निरीक्षण आहे. राज्याचं नेतृत्व फडणवीसच करत आहेत. ते अनुभवी नेते आहेत. महत्त्वाचे निर्णय त्यांच्याकडूनच ऐकत आहेत. त्यांच्या खात्याशी निगडीत काम आहे. त्यामुळे मी त्यांना भेटणार आहे, असे राऊत म्हणाले. पुढे ते असेही म्हणाले की, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री कोणत्याही पक्षाचा नसतो. मी फडणवीसांना भेटणार. मोदी आणि शहांनाही भेटणार. माझ्याबाबत काय झालं त्याची माहिती मी मोदी आणि शहा यांना देणार आहे.
Join Our WhatsApp Community