शिवेसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांनी केलेल्या बंडाचा आजचा चौथा दिवस असून शिंदेंकडे शिवसेनेच्या दोन तृतीयांश आमदारांचा पाठिंबा आहे, हे त्यांच्या पत्राद्वारे स्पष्ट झाले आहे. यासंदर्भात माध्यमांशी बोलताना संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. कोण म्हणतं ४० आहेत कोण म्हणतं १४० आमदार आहेत. शिंदेगटातील आकडा वाढत असला तरी महाविकास आघाडीतील तिनही पक्ष एकसंघ आहे. ठीके, शिवसेनेचा आकडा कमी झाला आहे, असे शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांनी म्हटले आहे. पुढे बोलताना ते म्हणाले, लोकशाहीत बहुमत आकड्यांवर चाललं आहे. आकडा आणि बहुमत हे फार चंचल असतं. आता ही सर्व कायदेशीर लढाई आहे.
(हेही वाचा – ‘शिवसेनेने’च ‘शिंदे गटा’ला गुवाहटीला पाठवलं? एकनाथ शिंदेंनी काय केले स्पष्ट?)
तेव्हाच शिवसेनेवरील श्रद्धेची खरी कसोटी लागेल
दरम्यान, संजय राऊत यांनी बाळासाहेब ठाकरे यांचे नाव घेत पुन्हा एकदा फुटलेल्या आमदारांना भावनिक साद घालण्याचा प्रयत्न केला आहे, ज्या दिवशी हे आमदार मुंबईत येतील , त्याच दिवशी त्यांच्या निष्ठेची, बाळा साहेबांवरील भक्तीची आणि शिवसेनेवरील श्रद्धेची खरी कसोटी लागेल. आम्हाला पूर्ण विश्वास आहे सभागृहात हा विषय येईल, तेव्हा महाविकास आघाडीच्या बाजूने आमदारांचा कौल असेल, असं राऊत यांनी म्हटले आहे.
धमक्या देण्याएवढा त्यांचा माज वाढला
नारायण राणे यांनी शरद पवारांवर केलेल्या ट्विटचाही राऊतांनी समाचार घेतला आहे. पवारांना धमक्या देण्यापर्यंत त्यांना माज वाढला आहे, असे राऊत म्हणाले. शरद पवार महाराष्ट्राचे सुपूत्र आहेत. आम्हाला धमक्या द्या. आम्ही बघून घेऊ. पण पवार साहेबांना धमक्या देण्याएवढा त्यांचा माज वाढला आहे. ही भाजपची अधिकृत भूमिका आहे का, हे मोदी आणि शाहांनी स्पष्ट करावं. आम्हीही तसेच प्रत्युत्तर देऊ, असा इशारा राऊतांकडून देण्यात आला आहे.
Join Our WhatsApp Community