शिवसेनेतून एकनाथ शिंदे यांच्यासह बंड करुन बाहेर पडलेल्या 40 आमदारांविरोधात आता शिवसैनिक मुंबईत चांगलेच आक्रमक झाले आहेत. त्यामुळेच आता बंडखोर आमदारांच्या मुंबईतील घराबाहेर सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली आहे. असे असतानाच आता शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी केलेल्या एका विधानामुळे खळबळ उडाली आहे. मी घेतलेल्या मुलाखतीमुळे एकनाथ शिंदे यांच्यावर खटला भरला गेला आणि मग आनंद दिघे धर्मवीर झाले, असे विधान संजय राऊत यांनी केले आहे.
…तेव्हा ते धर्मवीर झाले
आनंद दिघे यांना मी जवळून ओळखतो. त्यांची मुलाखत मी घेतली आहे. त्यामुळे दिघे आम्हाला सांगू नका. गद्दारांना क्षमा नाही, हे आनंद दिघे यांचे विधान मी त्यावेळी लिहून घेतले आहे आणि त्यावर त्यांच्यावर खटला भरला गेला आणि त्यांना तुरुंगात जावं लागलं. तेव्हा ते धर्मवीर झाले, असे धक्कादायक विधान दहिसर येथील शिवसेनेच्या मेळाव्यात संजय राऊत यांनी केले आहे.
(हेही वाचाः ‘बंडखोर आमदारांचे असंख्य बाप आहेत’, राऊतांची जीभ घसरली)
मोदी-शहा सुद्धा रस्ता बदलतात
तुमच्याकडे जी ताकद आहे ती तुम्हाला शिवसेनेने दिली आहे. हे वैभव तुम्हाला शिवसेनेमुळे मिळाले आहे. शिवसेना या चार अक्षरांनी आम्हाला आज राष्ट्रीय नेतेपद दिले आहे. आम्हाला पाहिल्यावर मोदी आणि शहा सुद्धा रस्ता बदलतात, असेही राऊत यावेळी म्हणाले.
(हेही वाचाः राज्यात राष्ट्रपती राजवट लागणार? राज्यपालांना पत्र)
Join Our WhatsApp Community