राऊत म्हणतात, विधान भवन हे सुद्धा सेना भवन

81

राज्यसभा निवडणुकांचा निकाल आता लांबणीवर गेला आहे. पण तरीही या निवडणुकीत महाविकास आघाडीचे सर्व उमेदवार जिंकून येतील असा विश्वास महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून व्यक्त करण्यात येत आहे. शिवसेना नेते आणि राज्यसभेतील उमेदवार यांनीही या विजयाबाबत आपलं मत व्यक्त केलं आहे.

इथेच जल्लोष करू

महाविकास आघाडीचे चारही उमेदवार राज्यसभा निवडणुकीत जिंकून येतील. या विजयापासून आम्हाला कोणीही रोखू शकत नाही. आम्ही जिंकून आलो तर आम्ही विधान भवनाच्या आवारातच जल्लोष करू, विधान भवन हे शिवसेना भवनंच आहे, असे वक्तव्य करत संजय राऊत यांनी आपल्या विजयाची भविष्यवाणी केली आहे.

(हेही वाचाः भाजपच्या शिष्टमंडळाची निवडणूक आयोगाकडे धाव, तीन मते रद्द करण्याची मागणी)

दुस-या संजयचं काय?

शिवसेनेकडून राज्यसभेसाठी संजय राऊत आणि संजय पवार यांना उमेदवारी देण्यात आली आहे. यामध्ये संजय पवार आणि भाजपचे उमेदवार धनंजय महाडिक यांच्यात चुरशीची लढत होणार असून, या दोघांपैकीच एकाचा पत्ता कट होऊ शकतो, असे म्हटले जात आहे. पण यावर आता संजय राऊत यांनी मोठं विधान केलं आहे. शिवसेनेच्या संजय पवार यांना माझ्यापेक्षा जास्त मतं मिळतील, असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.

मतमोजणीला विलंब

भाजपकडून राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड, काँग्रेस आमदार यशोमती ठाकूर आणि शिवसेना आमदार सुहास कांदे यांच्या मतांवर आक्षेप घेण्यात आला आहे. यासाठी भाजपच्या शिष्टमंडळाने केंद्रीय निवडणूक आयोगाच्या मुख्य निवडणूक आयुक्तांची भेट घेऊन आक्षेप नोंदवला आहे. त्यामुळे आता या निवडणुकीच्या मतमोजणीला विलंब होत आहे.

(हेही वाचाः आम्ही ज्याला मत दिलं तोच निवडून येईल, मतदानानंतर हितेंद्र ठाकूरांची प्रतिक्रिया)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.