Shiv Sena leader राहुल कणाल यांचा संजय राऊत यांना कायदेशीर कारवाईचा इशारा

दोन दिवसांपूर्वी पत्रकार परिषद घेऊन कणाल यांनी जाहीर आव्हान देत, “आमच्यावरील आरोप सिद्ध करा नाही तर खासदारकीचा राजीनामा द्या”,असं आव्हानच राऊत यांना दिलं आहे.

295
Shiv Sena leader राहुल कणाल यांचा संजय राऊत यांना कायदेशीर कारवाईचा इशारा
Shiv Sena leader राहुल कणाल यांचा संजय राऊत यांना कायदेशीर कारवाईचा इशारा

दोन दिवसांपूर्वी खिचडी घोटाळ्यावरून शिवसेना उबाठा गटाचे (shiv Sena UBT) नेते संजय राऊत यांनी शिवसेना (शिंदे) नेत्यांवर आरोप केल्यानंतर शिवसेना नेते राहुल कणाल (Rahul Kanal) आणि अमेय घोले (Amey Ghole) यांनी थेट राऊत यांना आव्हानच दिलं आहे. हे आव्हान देऊन दोन दिवस झाले तरी उबाठा गटाकडून काहीच प्रतिक्रिया न आल्याने शुक्रवारी कणाल यांनी समाजमाध्यमांवरून उबाठाला पुन्हा आठवण करून देत कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा दिला आहे.

कणाल यांनी समाजमाध्यमांवर राऊत यांना थेट ‘माफी मागा अन्यथा कायदेशीर कारवाईला सामोरे जा’,असा संदेश दिला आहे. “पत्रकार परिषद घेणाऱ्यांना उघडे करेन.. वस्त्रहरण करेन पूर्ण.. चॅलेंज किया था ओपन मे, डर गया क्या संजय राऊत? मै साई बाबा का भक्त हू, तुम जाणते हो.. पब्लिकली अपोलोजाईज करो, वरना फेस द लॉ.. मै वही बाप का बेटा हू, जिनको ३० साल से जाणते हो..!!!” असे कणाल यांनी म्हटले आहे.

(हेही वाचा – Shiv Sena UBT मुळे सिद्दीकी कॉंग्रेस पक्ष सोडणार? )

दोन दिवसांपूर्वी पत्रकार परिषद घेऊन कणाल यांनी जाहीर आव्हान देत, “आमच्यावरील आरोप सिद्ध करा नाही तर खासदारकीचा राजीनामा द्या”,असं आव्हानच राऊत यांना दिलं आहे. तर आमच्यावरील आरोप सिद्ध केल्यास आम्ही राजकारणाचा त्याग करू. आरोप सिद्ध न झाल्यास संजय राऊत राजकारण सोडणार काय? असा सवाल अमेय घोले यांनी केला आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.