अमृतसर येथे शुक्रवारी एक धक्कादायक घटना घडली आहे. शिवसेनेचे नेते सुधीर सुरी यांच्यावर दिवसा ढवळ्या गोळी झाडल्याची घटना अमृतसरमधील गोपाल मंदिर परिसरात घडली आहे. दरम्यान, सुरी यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार करण्यात येत होते. पण उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाल्याचे कळत आहे.
अज्ञात व्यक्तीकडून गोळीबार
अमृतसरच्या गोपाल मंदिराबाहेर कच-यात देवांच्या मूर्ती सापडल्यामुळे त्या विरोधात सुधीर सुरी यांनी मंदिराबाहेर धरणे आंदोलन सुरू केले होते. याचवेळी गर्दीतून अज्ञात इसमाकडून त्यांच्यावर गोळीबार करण्यात आला. त्यानंतर सुरी यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. या हल्ल्यानंतर पोलिसांनी परिसरात नाकाबंदी केली असून एका हल्लेखोराला अटक करण्यात आल्याचेही सांगण्यात येत आहे.
(हेही वाचाः ‘राष्ट्रवादीचे 12 नेते फुटले आहेत,मुहूर्त ठरायचा बाकी आहे’, शिंदे गटाच्या आमदाराचा दावा)
याआधी सुद्धा रचला होता मारण्याचा कट
गेल्या काही दिवसांपासूनच सुधीर सुरी यांच्यावर हल्ला करण्याची योजना आखण्यात येत असल्याचे सांगितले जात आहे. पोलिसांनी ऑक्टोबरमध्ये 4 गॅंगस्टर्सना अटक केली होती. यानंतर पोलिसांकडून करण्यात आलेल्या चौकशीत हा खुलासा झाला होता. सुधीर सुरी यांच्यावर दिवाळीपूर्वीच हल्ला करण्याचा कट रचण्यात आला होता, असे चौकशीत उघड झाले होते. अटक करण्यात आलेले गँगस्टर्स हे रिंदा आणि लिंडा टोळीतील होते.
Join Our WhatsApp Community