अमिताभच्या बंगल्याची भिंत पाडण्यास महापालिकाच करतेय टाळाटाळ

रस्ता रुंदीकरणाच्या प्रकल्पासाठी जुहू येथील अमिताभ बच्चन यांच्या प्रतीक्षा बंगल्याची कंपाउंड भिंत पाडण्यासाठी बीएमसी अर्थात बृहन्मुंबई महानगरपालिका विनाकारण कारणे देत आहे, असं महाराष्ट्राचे लोकायुक्त न्यायमूर्ती व्ही. एम. कानडे यांनी मंगळवारी सांगितले.

नोटीस जारी करा

महाराष्ट्र लोकायुक्त न्यायमूर्ती व्ही.एम. कानडे यांनी आपल्या नुकत्याच दिलेल्या आदेशात म्हटले आहे की, भिंत तोडण्याच्या कामाला किमान एक वर्षाचा विलंब झाला असून, नागरी संस्थेने उपअभियंता (रस्ते) पश्चिम उपनगर यांच्या नावाने नोटीस जारी करावी.

बीएमसीची टाळाटाळ 

यावर बीएमसीने अमिताभ बच्चन यांच्या बंगल्याची भिंत अद्याप पाडलेली नाही, कारण रस्ता रुंदीकरण प्रकल्पासाठी कोणताही कंत्राटदार नाही, असे म्हटले होते. शिवसेना-नियंत्रित नागरी संस्थेने पुढील आर्थिक वर्षात रस्ता कंत्राटदाराची नियुक्ती केल्यावर ती भिंत पाडून जमीन घेणार असल्याचेही सांगितले.

( हेही वाचा :महापौरांना पुन्हा आठवले कोरोना स्प्रेडर! म्हणाल्या…)

लोकायुक्तांनी फटकारले

जेव्हा जेव्हा रस्ता रुंदीकरणाचा प्रकल्प हाती घेतला जातो, तेव्हा बीएमसीकडून अंमलबजावणीसाठी पुरेशी अर्थसंकल्पीय तरतूद केली जाते. हे लक्षात घेऊन लोकायुक्तांनी आपल्या आदेशात म्हटले आहे की, बीएमसीला अनावश्यक सबबी देऊन बच्चन कुटुंबाच्या बंगल्याची भिंत पाडायची नाही हे उघड आहे.

काय होती योजना?

2017 मध्ये, जुहू येथील लिंकिंग रोडवरील बंगल्यातील जमिनीचा काही भाग अमिताभ बच्चन आणि त्यांच्या शेजार्‍यांना इस्कॉन मंदिराकडे जाणार्‍या वेटिंग लेनमधील रहदारी कमी करण्यासाठी सुपूर्द करण्यास सांगण्यात आले होते. बंगल्याच्या कंपाऊंड भागावरील संत ज्ञानेश्वर रोडचे ४० फुटांवरून ६० फुटांपर्यंत रुंदीकरण करण्याची योजना बीएमसीने आखली होती.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here