शिवसेना नेते एकनाथ शिंदेंसह समर्थक आमदारांनी बंडखोरी केल्याने शिवसेनेला मोठा धक्का बसला आहे. पण त्याचबरोबर महाविकास आघाडी सरकारही धोक्यात आले आहे. आता बंडखोर आमदारांना धडा शिकवण्यासाठी शिवसेनेने मोठी खेळी केली आहे. शिवसेना नवनियुक्त गटनेते अजय चौधरी यांनी विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांना पत्र दिले आहे. विधानसभेच्या विधीमंडळ बैठकीस गैरहजर राहाणाऱ्या आमदारांवर कारवाई करण्याची मागणी या पत्रात करण्यात आली आहे.
(हेही वाचा भाजपकडून एकनाथ शिंदेंना मोठी ‘ऑफर’)
Join Our WhatsApp Communityशिवसेनेचे प्रतोद सुनील प्रभू यांनी शिवसेनेच्या बंडखोर आमदारांना उपस्थित राहण्याचे पत्र काढले होते. यावर एकनाथ शिंदे यांनी भरत गोगावले यांची प्रतोद म्हणून नियुक्ती केली. या आरोप प्रत्यारोपांनंतर शिवसेनेचे गटनेते अजय चौधरी यांनी विधानसभा उपाध्यक्षांना पत्र देत बंडखोर आमदारांवर कारवाईची मागणी केली आहे. जे आमदार उपस्थित राहिले नाहीत अशा १२ आमदारांवर कारवाईची मागणी केली आहे. त्यांची आमदारकी रद्द करण्याची ही मागणी केली आहे.