Shiv Sena मंत्र्याने आदित्य ठाकरेंना भर सभागृहात सुनावले!

127
Shiv Sena मंत्र्याने आदित्य ठाकरेंना भर सभागृहात सुनावले!
  • खास प्रतिनिधी 

शिवसेना उबाठा नेते आदित्य ठाकरे यांना पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी भर सभागृहात खडे बोल सुनावले. आदित्य ठाकरे यांनी गुलाबराव पाटील यांना मंत्री म्हणून अभ्यास करून यायला सांगा, अशी मागणी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडे केली, तर त्यावर गुलाबराव पाटील यांनी तात्काळ, “यांच्या ***ला कळलं होतं म्हणून त्यांनी मला हे खातं दिलं होतं,” अशा शब्दात सुनावले. (Shiv Sena)

(हेही वाचा – Cyber ​​Crime : राज्यात सायबर गुन्हेगारांची संख्या वाढली; वर्षभरात सात हजार कोटींची सायबर लूट)

विषय कसा सुरू झाला? 

अधिवेशनाच्या तिसऱ्या दिवशी प्रश्नोत्तराच्या तासात, राज्यातील सात जिल्ह्यांमध्ये भूजल नायट्रेटचे प्रमाण रोखण्याबाबतचा प्रश्न आमदार रोहित पवार यांनी उपस्थित केला होता. या प्रश्नावर मंत्री गुलाबराव पाटील यांनी सविस्तर उत्तर देत असतानाच आदित्य ठाकरे उभे न राहता बसूनच काही काही प्रश्न विचारत असल्याने पाटील संतापले आणि त्यांना, “तुम्ही शांत बसा, तुम्ही शांत बसा,” असा दम भरला. त्यावर आदित्य ताडकन उठून बोलण्यासाठी उभे राहिले. अध्यक्षांनी मात्र मध्यस्थी करत विषय मिटवण्याचा प्रयत्न केला आणि, “आपण आपसात बोलू नका, इथे अध्यक्ष आहेत त्यांच्याकडे बघून बोला,” असे आमदार आणि मंत्र्यांना सांगून आदित्य ठाकरे यांना खाली बसवले.

आपले उत्तर पूर्ण करण्यापूर्वी पाटील यांनी आमदारांना सांगितले की, तुमचे अजून काही प्रश्न असतील तर कृषीमंत्री, पर्यावरण मंत्री यांच्याशी एक बैठक लावू आणि काही पर्याय निघतो का ते पाहू, असे आश्वासन दिले. (Shiv Sena)

(हेही वाचा – कोर्टाच्या तारखा लवकर मिळतात, पण एमआरआय-सिटी स्कॅनसाठी प्रतीक्षा ; Rahul Narwekar यांची नाराजी)

खाते कळलं आहे की नाही?

त्यानंतर आदित्य ठाकरे यांनी याच विषयावर बोलताना म्हटले की, “आम्ही विरोधी पक्ष जरी असलो तरी काही चांगलं करायचं असेल, तिथे आम्ही सूचना करू आणि आम्ही सहकार्य करू. मंत्र्यांनी उत्तरात सांगितले की, अन्य खात्यांशी बैठका लागू तर यांना (गुलाबराव पाटील) खाते कळलं आहे की नाही? मंत्री सत्ताधारी पक्षाच्या आमदारांनाही उत्तरे देऊ शकत नाहीत, त्यामुळे हा प्रश्न राखून ठेवा आणि मंत्र्यांना सांगा अभ्यास करून उत्तर द्या,” अशी मागणी ठाकरे यांनी अध्यक्षांकडे केली. (Shiv Sena)

त्यांना कळलो म्हणून खाते दिले

गुलाबराव पाटील यांनीही लगेच उभे राहात ठाकरे यांना तिथेच कडक शब्दात उत्तर देऊन गप्प केले. पाटील अध्यक्षांकडे पाहून म्हणाले, “त्यांच्या ***ला मी कळलो होतो, म्हणून त्यांनी मला हे खातं दिलं होतं, हे त्यांना माहीत नाही अजून.” पाटील यांनी तेच वक्तव्य पुन्हा दुरुस्त करत दुसऱ्या वेळी त्याच वाक्यात ‘वडिलांना’ अशी सुधारणा केली.

यावर शिवसेना उबाठाचे आमदार भास्कर जाधव आणि आदित्य ठाकरे यांनी आरडाओरड करत मंत्र्यांना समज द्यावी, अशी विनंती अध्यक्षांना केली. (Shiv Sena)

(हेही वाचा – CM Yogi Adityanath यांना बॉम्बने उडवण्याची धमकी !)

सन्मान कमी व्हायची वेळ आणू नका

अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी यावर बोलताना सांगितले की, “महाराष्ट्र विधानसभा की देशात सगळ्यात उत्कृष्ट विधानसभा मानली जाते. आम्ही जेव्हा देश पातळीवरील पीठासीन अधिकाऱ्यांच्या परिषदेला जातो तेव्हा महाराष्ट्र विधानसभेबद्दल जो मान सन्मान दिला जातो, तो कुठे कमी व्हायची वेळ आणू नका. आपण कोणावरही वैयक्तिक टिप्पणी करणे चुकीचे आहे आणि मी ते रेकॉर्डवरून काढून टाकणार,” असे आश्वासन अध्यक्षांनी दिले. (Shiv Sena)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.