राज्यात सुरू असलेल्या सत्तासंघर्षांच्या नाट्यात शिवसेनेला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. शिवसेने गुहागरचे आमदार भास्कर जाधव हे नॉट रिचेबल झाल्याचे सांगितले जात आहे. भास्कर जाधव हे कालपर्यंत सेनेसोबत होते. मात्र आता त्यांचा फोन लागत नसल्याने आणि संपर्क होत नसल्याने अनेक तर्क-वितर्कांना उधाण आले आहे. भास्कर जाधव हे देखील शिंदे गटात सामील झाले असल्याची शक्यता वर्तविली जात आहे. जर ते खरंच शिंदेंना पाठींबा देण्यासाठी शिंदे गटात सहभागी झाले तर सेनेला मोठा बसणार हे निश्चित आहे.
(हेही वाचा – शिवसेनेच्या धमकीला शिंदेंचे उत्तर! कुणाला घाबरवता, कायदा आम्हालाही कळतो! )
शिंदे गटाची ताकद वाढतेय
एकनाथ शिंदे यांच्यासोबत अपक्ष आमदार धरून ४९ आमदार आहे. तर गुरूवारी शिवसेनेकडे भास्कर जाधव यांच्यासह केवळ १५ आमदार होते. मात्र आता भास्कर जाधव यांचा फोन लागत नसल्याने ही शक्यता वर्तविली जात आहे. एकनाथ शिंदे यांनी राज्यातील साधारण ८ ते ९ जिल्ह्यातील शिवसेनेचे गळाला लावले होते, मात्र काल गुरूवारपर्यंत मुंबई आणि तळकोकणातील आमदार शिवसेनेच्या गोटात होते. परंतु, काल मुंबईतील मंगेश कुडाळकर आणि सदा सरवणकर गुवाहाटीत जाऊन शिंदे गटात सामील झाले होते. त्यानंतर आज भास्कर जाधव देखील नॉट रिचेबल झाल्याने शिवसेनेची धाकधुक वाढली आहे. तर दुसरीकडे शिंदे गटाचे संख्याबळ वाढत चालले आहे. एकनाथ शिंदे गटात आतापर्यंत जवळपास ४५ ते ५० आमदार दाखल झाल्याची माहिती मिळत आहे.
भास्कर जाधव नेमके आहेत कुठे?
दरम्यान, भास्कर जाधव यांचे स्विय सहाय्यक यांनी असा खुलासा केला आहे की, जाधव हे चिपळूणमध्येच आहेत त्यांच्या बंधूची शस्रक्रिया झाल्यामुळे जाधव चिपळूणमध्ये आहेत. वरिष्ठ नेत्यांना कल्पना देऊनच जाधव गावी आल्याचे सांगण्यात आले आहे. त्यामुळे भास्कर जाधव गुहावटीमध्ये गेल्याच्या बातम्या फोल असल्याचेही त्यांनी सांगण्यात आले.