राज्यपालांवर टीका करताना भास्कर जाधवांची जीभ घसरली, म्हणाले…

81

राज्यात महाविकास आघाडी सरकार सत्तेत असताना शिवसेना आणि राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यातील वाद अनेकदा समोर आले आहेत. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी नुकतेच गुजराती आणि मारवाडी लोकांबाबत केलेल्या विधानामुळे त्यांच्यावर जोरदार टीका होत आहे. यातच आता कोश्यारी यांच्यावर टीका करताना शिवसेना आमदार भास्कर जाधव यांची जीभ घसरली आहे. राज्यपालांचा उल्लेख जाधव यांनी घरगडी असा केला आहे. चिपळूण येथील शिवसेना कार्यकर्त्यांच्या बैठकीत ते बोलत होते.

भास्कर जाधव यांचा आरोप

राज्यपाल कोश्यारी यांनी केलेल्या महाराष्ट्रविरोधी वक्तव्यावरुन लोकांचे लक्ष वळवण्यासाठी संजय राऊत यांना अटक करण्यात आली आहे. संजय राऊत यांनी भारताचे उपराष्ट्रपती वेंकय्या नायडू यांना पत्र लिहिलं होतं. तसेच 5 ऑगस्टपर्यंत ईडीकडे वेळही मागितला होता. पण राऊतांच्या पत्राला कोणतंही उत्तर न देता ईडीने अटक केली असल्याचा आरोप भास्कर जाधव यांनी केला आहे.

(हेही वाचाः तेजस ठाकरे राजकारणात येणार? आदित्य ठाकरे म्हणतात, ‘तो…’)

मंत्रिमंडळ विस्तार होऊच नये…

यासोबतच भास्कर जाधव यांनी राज्यातील मंत्रिमंडळ विस्तारावर देखील निशाणा साधला आहे. शिंदे-फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार होऊच नये, त्याची गरजही नाही. लोकशाही काय असते ते आता लोकांना समजले आहे. त्यामुळे आता मंत्रिमंडळ विस्तारापेक्षा भाजपचा कार्यक्रम राबवला जावा अशा माझ्या शुभेच्छा आहेत, असा खोचक टोला भास्कर जाधव यांनी लगावला आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.